पूजानं सांगितला पहिल्या किसिंगचा अनुभव; वडिलांनी दिला होता हा सल्ला

पूजानं सांगितला पहिल्या किसिंगचा अनुभव; वडिलांनी दिला होता हा सल्ला

पूजाला खरी प्रसिद्धी मिळाली ‘सडक’ या चित्रपटातूनच. 1991 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळी पूजा आणि संजय दत्तच्या किसिंग सीनमुळं तुफान चर्चेत होता.

  • Share this:

मुंबई 7 मार्च: पूजा भट्ट (Pooja Bhatt) ही 90च्या दशकात एक लोकप्रिय अभिनेत्री होती. मादक अदा आणि जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर तिनं तब्बल एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पूजाला खरी प्रसिद्धी मिळाली ‘सडक’ या चित्रपटातूनच. 1991 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळी पूजा आणि संजय दत्तच्या किसिंग सीनमुळं तुफान चर्चेत होता. त्यांच्या चुंबन दृश्यांचे पोस्टर देखील देशभरात लावण्यात आले होते. चित्रपटात हा सीन कितीही धाडसी दिसत असला तरी चित्रीकरणाच्या वेळी मात्र पूजा ढसाढसा रडली होती. परंतु महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या एका सल्ल्यामुळं अखेर तिनं तो सीन केला. (Pooja Bhatt Sanjay Dutt kissing scene)

त्यावेळी काय म्हणाले होते महेश भट्ट?

पूजानं अलिकडेच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं त्यावेळी तिनं सडक चित्रपटाच्या वेळी घडलेला हा किस्सा सांगितला. ती म्हणाली, “त्यावेळी मी केवळ 18 वर्षांची होते. संजयला मी निटसं ओळखत देखील नव्हते. अन् अशा परिस्थितीत इतक्या लोकांसमोर त्याचं चुंबन घ्यायचं या कल्पनेनच मला रडू फुटलं. हा सीन करण्यास मी थेट नकार दिला होता. खरं तर चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच मी किसिंग करण्यास टाळाटाळ करत होते. पण अखेर तो दिवस उजाडलाच जेव्हा मला तो सीन करावा लागला. हा सीन करण्यापूर्वी वडिलांनी मला खोलीत नेलं अन् सांगितलं मी एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे. याक्षणी मी चित्रपटातील ते पात्र जगत आहे. जर हा सीन करताना माझ्या मनात अश्लिल भावना आल्या तर पडद्यावर देखील ते तसेच दिसेल. त्यामुळं डोकं शांत ठेवून अत्यंत प्रेमानं तो सीन कर तुला भीती वाटणार नाही. असा सल्ला त्यांनी दिला. तो सल्ला मी ऐकला अन् चित्रपटातील तो किसिंग सीन सुपरहिट झाला.”

पूजा भट्ट ही प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे. सडक या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील त्यांनी केलं होतं. या चित्रपटानंतर पूजानं ‘दिल है की मानता नही’, ‘जुनून’, ‘फिर तेरी कसम याद आयी’ यांसारख्या अनेक चित्रपटात किसिंग सीन केले. किंबहूना बॉलिवूडमध्ये किसिंग सीन करण्याचा खरा ट्रेंड पूजा भट्टमुळेच सुरु झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Published by: Mandar Gurav
First published: March 7, 2021, 5:29 PM IST

ताज्या बातम्या