मुंबई, 25 सप्टेंबर- बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बऱ्याच दिवसांनंतर पडद्यावर झळकणार आहे. लवकरच अभिनेत्री ‘पोन्नियिन सेल्वन’या बहुप्रतीक्षित चित्रपटात दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ‘मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात दक्षिणेतील अनेक मोठमोठे कलाकार काम करत आहेत. यासोबतच मणिरत्नम यांची ऑल टाईम फेव्हरेट म्हटली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या रायसुद्धा आहे. नुकतंच या चित्रपटासंदर्भात आयोजित एका पत्रकार परिषदेत ऐश्वर्या राय बच्चनने सांगितलं की, आराध्या बच्चनचंही या चित्रपटाशी खास कनेक्शन आहे.पाहूया ते नेमकं काय आहे. मणिरत्नम हे प्रचंड लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांच्या चित्रपटात एकदा तरी काम करता यावं अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. त्यांच्या चित्रपटांचा थाट काही निराळाच असतो. तर दुसरीकडे ऐश्वर्या रायला मणिरत्नम यांची आवडती अभिनेत्री म्हटलं जातं. मणिरत्नम आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात खूप छान बॉन्डिंग आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दोघांना एकत्र चित्रपट करणं शक्य झालं नव्हतं. ऐश्वर्याने मणिसोबत 2010 मध्ये आलेल्या ‘रावण’ चित्रपटात काम केलं होतं. आता 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या राय त्यांच्यासोबत बिग बजेट चित्रपटात काम करत आहे. नुकतंच चित्रपटा संदर्भात झालेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान ऐश्वर्या रायने म्हटलं की, मणी सरांसोबत काम करणं हा एक वेगळा अनुभव आहे. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना एक खास अनुभव देतात. या आगामी बहुचर्चित चित्रपटात ऐश्वर्या राय राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हा ऐश्वर्याला विचारण्यात आलं की, तिची लेक आराध्याची तिच्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया कशी होती? यावर ऐश्वर्याने सांगितलं की, ती खूप उत्साहित आहे. एकदा ती सेटवर आली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. त्याचबरोबर ती मणी सरांचा खूप आदर करते. आराध्याचा उत्साह पाहून मणी सरांनी तिला चित्रपटातील एका सीनसाठी ‘अॅक्शन’ बोलण्यास सांगितलं होतं. त्यावेळी ती प्रचंड उत्साहीत झाली होती.
ऐश्वर्या रायने बोलताना पुढे सांगितलं की, जेव्हा मणी सरांनी आराध्याला ‘अॅक्शन’ बोलण्याची संधी दिली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ती ‘अॅक्शन’ बोलल्याचं मोठ्या उत्साहाने मला सांगत आली. **(हे वाचा:** Richa-Ali Wedding: कतरिना-विकीसारखे ‘ते’ प्रोटोकॉल अली-रिचाच्या लग्नात नसणार; काय आहे कारण? ) त्यावेळी मी तिला म्हटलं, हा क्षण तुझ्यासाठी फार खास आहे कारण मणी सर अशी संधी प्रत्येकाला देत नाहीत. आम्हालाही अशी संधी कधीच मिळालेली नाहीय. त्या दिवशी आराध्या खूप खुश होती. मला वाटतं की, ती मोठी झाल्यावर तो क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक क्षण बनेल.अशाप्रकारे आराध्याचंसुद्धा या चित्रपटाशी एक खास कनेक्शन बनलं आहे.