मुंबई, 25 सप्टेंबर- बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. हे सेलिब्रिटी कपल बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. त्यांनी अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु जसजशा लग्नाच्या बातम्या येत आहेत, तसतसे लग्नाच्या योजना देखील समोर येत आहेत. नुकतंच या दोघांची हटके लग्नपत्रिका व्हायरल झाली होती. त्यानंतर आता रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी त्यांच्या लग्नात फोनवर बंदी घालण्यासारखा कोणताही नियम बनवला नसल्याचे समोर आलं आहे.सध्या या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचं वारं वाहात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूड लग्न म्हटलं की, त्यांचा थाटमाट आणि सोबतच त्यांचे प्रोटोकॉलसुद्धा पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांमध्ये, अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या विवाहसोहळ्यात येणाऱ्या पाहुण्यांना फोन न आणण्याचा प्रोटोकॉल अवलंबला होता. यामध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफ, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सोबतच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांसारख्या मोठमोठया कलाकारांचा समावेश आहे. तर काही कलाकारांनी अत्यंत गुपचूप लग्न करत नंतर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता सर्वांचं लक्ष रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नाकडे लागून आहे. परंतु या बॉलिवूड ट्रेंडपासून दूर होत अली आणि रिचा यांना त्यांच्या लग्नाला उपस्थित पाहुण्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्या लग्नाचा आनंद घेता यावा अशी इच्छा आहे. हाच विचार करुन अली आणि रिचाने लग्नात कोणतंही बंधन न घालण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या आमंत्रण पत्रिकेत असंही म्हटलं होतं की, “तुमचा फोन सोडा आणि आनंद घ्या. क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची काळजी करु नका. रिअल टाइममध्ये कॅप्चर करा.” आता चाहत्यांना या लग्नाची प्रचंड उत्सुकता लागली आहे.
रिचा आणि अली 4 ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही याआधीच लग्न करणार होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी आपलं लग्न लांबणीवर टाकलं होतं. येत्या 30 सप्टेंबरपासून या दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु होणार आहेत. **(हे वाचा:** Richa Chadha-Ali Fazal Wedding: रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नपत्रिकेने वेधलंय लक्ष; ‘या’ गोष्टीवरुन मिळाली हटके आयडिया ) यामध्ये कॉकटेल, मेहंदी, यांसारखे प्री वेडिंग फ़ंक्शन होणार आहेत. रिचाला आपल्या लग्नात शाही लुक हवा आहे. त्यासाठी अनेक डिझायनर्स एकत्र मिळून हा पोशाख बनवत आहेत. अभिनेत्रींच्या पोशाखाला मिळता-जुळता अलीचा पोशाख असणार आहे. चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता लागून आहे.

)







