जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / PM Modi यांनी केलं The Kashmir Filesचे कौतुक, सिनेमाच्या टीमची घेतली भेट

PM Modi यांनी केलं The Kashmir Filesचे कौतुक, सिनेमाच्या टीमची घेतली भेट

PM Modi यांनी केलं The Kashmir Filesचे कौतुक, सिनेमाच्या टीमची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील The Kashmir Files हा सिनेमा आवडला असून त्यांनी या सिनेमाच्या टीमची भेट घेतली. कश्मीर फाइल्सचे प्रोड्युसर अभिनेषेक अग्रवाल यांनी याबाबत फोटो शेअर केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 मार्च: द कश्मीर फाइल्स  (The Kashmir Files) या विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित सिनेमाची सध्या चर्चा सुरू आहे. या सिनेमाबाबत सोशल मीडियावर विशेष चर्चा सुरू आहे. काहींनी हा सिनेमा विदारक सत्य मांडणारा आहे असं म्हटलं आहे तर अनेकांना सिनेमा पाहून रडू कोसळल्याचे व्हिडीओही व्हायरल (The Kashmir Files viral video) झाले आहेत. दरम्यान काही प्रमाणात या ‘द कश्मीर फाइल्स’वर टीका देखील होत आहे. दरम्यान अशाप्रकारे प्रतिसाद मिळत असलेला सिनेमा आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi meet the team of The Kashmir Files) यांना देखील हा सिनेमा आवडला असून त्यांनी या सिनेमाच्या टीमची भेट घेतली. कश्मीर फाइल्सचे प्रोड्युसर अभिनेषेक अग्रवाल यांनी याबाबत फोटो शेअर केले आहेत. अभिषेक अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी त्यांनी अशा आशयाचं ट्वीट केलं आहे की, ‘माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना भेटून आनंद झाला. #TheKashmirFiles बद्दलचे त्यांचे कौतुक आणि चांगले शब्द यामुळे ही भेट खास ठरली. याआधी कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करताना एवढे अभिमानास्पद वाटले नव्हते.’ त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी देखील दिसत आहेत. हे वाचा- The Kashmir Files चे प्रमोशन करण्यास कपिल शर्माने नकार दिल्याचा विवेक अग्निहोत्रींचा खुलासा, हे आहे कारण अग्रवाल यांचे ट्वीट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील रीट्विट केले आहे. त्यांनी यावेळी असे म्हटले आहे की, मला तुमच्यासाठी खूप आनंद झाला आहे अभिषेक अग्रवाल. भारताचे सर्वात आव्हानात्मक सत्य मांडण्याचे धाडस तुम्ही दाखवले आहे. USA मधील #TheKashmirFiles स्क्रिनिंगने पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगाचा बदलता मूड सिद्ध केला.’

जाहिरात

‘द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाबाबत बोलायचं झालं तर हा सिनेमा काश्मिरी पंडितांवर आधारीत आहे. 90 च्या दशकात काश्मिरी पंडिंतांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या झालेल्या हत्या यावर आधारीत हा सिनेमा आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक अशी तगडी स्टार कास्ट आहे. सोशल मीडियावर देखील या सिनेमाच्या ट्रेलरच्या क्लिप्स व्हायरल होत आहेत. 11 मार्च रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा सुपरस्टार प्रभासच्या ‘राधेश्याम’ बरोबर होती. पण प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात राधेश्यामपेक्षा ‘The Kashmir Files’ यशस्वी ठरला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात