जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Pippa Teaser Out: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित चित्रपट; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर दमदार टीझर प्रदर्शित

Pippa Teaser Out: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित चित्रपट; स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर दमदार टीझर प्रदर्शित

Pippa Teaser

Pippa Teaser

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज ‘पिप्पा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर अतिशय दमदार आहे. पाहा VIDEO

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 ऑगस्ट : बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे ‘पिप्पा’ (Pippa Teaser Out). 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज ‘पिप्पा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर अतिशय दमदार आहे. चित्रपटाचा टीझर पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. इशान खट्टर आणि मृणाल ठाकूर स्टारर पिप्पाचा टीझर काही क्षणातच व्हायरल होताना पहायला मिळतोय. सध्या ‘पिप्पा’ च्या टीझरनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित ‘पिप्पा’ चित्रपट 2 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टीझरमध्ये दिसतंय की, 3 डिसेंबर 1971 रोजी देशाच्या सैनिकांसह संपूर्ण देश देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना रेडिओवर ऐकत आहे. ‘काही तासांपूर्वी पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर हवाई हल्ला केला. मी, इंदिरा गांधी, भारताच्या पंतप्रधान, पाकिस्तानशी युद्धाची घोषणा करते. जय हिंद’, असे शब्द कानावर पडताच धडाकेबाज अॉक्शनला सुरुवात होताना दिसतेय.

जाहिरात

‘संपूर्ण इतिहासात कधीही इतर कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी युद्ध लढले गेले नाही. पण आज इतिहास घडवण्याची वेळ आली आहे’. असं इशान खट्टर म्हणताना टीझरमधून पहायला मिळतंय. पिप्पाच्या दमदार टीझरवर सध्या सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. हेही वाचा -  Saisha Bhoir च्या व्हॅकेशनची खास झलक, VIDEO नं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष ‘पिप्पा’ ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या ‘द बर्निंग चाफीज’ या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटाची पटकथा रविंदर रंधावा, तन्मय मोहन आणि मेनन यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे. चित्रपटाचं संगीत ए. आर रहमान यांनी दिलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात