जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Saisha Bhoir च्या व्हॅकेशनची खास झलक, VIDEO नं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Saisha Bhoir च्या व्हॅकेशनची खास झलक, VIDEO नं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Saisha Bhoir

Saisha Bhoir

‘रंग माझा वेगळा मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली साईशा भोईर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते. नुकतंच साईशा तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 ऑगस्ट : ‘रंग माझा वेगळा’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साईशा भोईर(Saisha Bhoir). साईशाला या मालिकेतून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी तर मिळालीच याशिवाय तिचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर वाढलेला पहायला मिळाला. ‘रंग माझा वेगळा मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली साईशा सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत असते. नुकतंच साईशा तिच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. साईशानं ‘रंग माझा वेगळा’ही मालिका सोडली असून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्याआधी साईशा एका मोठ्या सुट्टीवर गेलेली पहायला मिळाली. साईशाच्या या व्हॅकेशनचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहे. नुकतंच ‘राजश्री मराठी’ नं त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर साईशाच्या व्हॅकेशनची एक खास झलक शेअर केली आहे. यामध्ये साईशानं व्हॅकेशमध्ये केलेली धमाल, मस्ती पहायला मिळत आहे. या व्हिडीओवरुन साईशानं तिच्या व्हॅकेशमध्ये लुटलेला आनंद स्पष्टपणे दिसतोय.

जाहिरात

साईशा भोईर पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसली. यावेळी तीनं विविध ठिकाणी जात तेथील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर चाहत्यांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या व्हॅकेशमध्ये साईशानं तिच्या आई-बाबांसोबत खूप आनंद लुटल्याचं दिसून आलं. हेही वाचा -  Raju Srivastav Health Update: राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भात दिलासादायक माहिती समोर बालकलाकार साईशा भोईरनं ‘रंग माझा वेगळा’ही मालिका सोडल्यानंतर आता ती नवा गडी नवं राज्य या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 8 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झी मराठी वाहिनीवर भेटीस येत आहे. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील, कश्यप परुळेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. त्यासोबतच बालकलाकार साईशा भोईर, वर्षा दांदळे आणि अनिता दाते हे कलाकारही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात