'श्रीमंताघरची सून' (Shrimantagharchi Sunn) या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अनन्या म्हणजेच अभिनेत्री रुपल नंद (Rupal Nand) एक फिजियोथेरपिस्ट देखिल आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळली होती, कसा होता रुपलचा अभिनय प्रवास जाणून घ्या.
सोनी मराठीवरील श्रीमंताघरची शून या मालिकेतील सर्वांची लाडकी अनन्या म्हणजेच अभिनेत्री रुवल नंद. रुपल मालिकेत मुख्या नायिकेची भूमिका साकारत आहे.
कॉलेज जीवनापासूनच ती अनेक एकांकीका स्पर्धांमध्ये सहभाग घेत होती. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून तिने आपले शिक्षण पूर्ण केलं होतं.
एका सौंदर्यस्पर्धेने आपल जीवन बदललं असं ती म्हणते. त्यात सहभागी झाल्यानंतर तीला सतीश राजवाडे जे स्पर्धेचे परिक्षक होते. यांच्याकडून मुंबई पुणे मुंबई या चित्रपटात एक भूमिका मिळाली.
मालिकेत ती अभिनेता यशोमन आपटे सोबत दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली आहे.