जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आणखी किती प्रतीक्षा? 8 वर्षांनंतरही शरीर संबंधास नकार, खासदार अन् अभिनेत्रीच्या प्रकरणात कोर्टाने सांगितलं...

आणखी किती प्रतीक्षा? 8 वर्षांनंतरही शरीर संबंधास नकार, खासदार अन् अभिनेत्रीच्या प्रकरणात कोर्टाने सांगितलं...

आणखी किती प्रतीक्षा? 8 वर्षांनंतरही शरीर संबंधास नकार, खासदार अन् अभिनेत्रीच्या प्रकरणात कोर्टाने सांगितलं...

आणखी किती प्रतीक्षा? असा सवाल उपस्थित करीत हे प्रकरण कोर्टात पोहोचलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 जून : ओडिया चित्रपट अभिनेत्री वर्षा प्रियदर्शिनी आणि अभिनेता-लोकसभा खासदार अनुभव मोहंती (Oriya film actress Varsha Priyadarshini and actor-Lok Sabha MP Anubhav Mohanty) यांचा घटस्फोट सध्या चर्चेत आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, अनुभव मोहंती यांच्या याचिकांवर कटकच्या एडीजेएम न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने वर्षा प्रियदर्शनीला आदेश दिला आहे की, दोन महिन्याच्या आत अनुभव मोहंतीचं घर रिकामी करा. याशिवाय अनुभव मोहंतीने वर्षाला दर महिन्याला 30 हजार रुपये पोटगी द्यावी, असेही निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनुभव मोहंती यांनी वर्षाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती की, तिने त्यांचे वडिलोपार्जित घर सोडावे, मी त्यांच्यासाठी स्वतंत्र घराची व्यवस्था करण्यास तयार आहे, असंही त्यांनी सांगितलं. याशिवाय दुसऱ्या याचिकेत त्यांनी वर्षा यांच्या उत्पन्नाचे स्रोतही उघड करण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणीनंतर निकाल राखून ठेवला होता. घटस्फोट प्रकरणात खासदार अनुभव मोहंती यांनी अनेक वेळा सोशल मीडियावर खासगी जीवनाबाबत खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत त्यांनी पत्नीसोबत लैंगिक संबंधाचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं की, आमच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. मात्र इतक्या वर्षांनंतरही पत्नी वर्षाने शरीर संबंध ठेवण्याची परवानगी दिली नाही. मी मानसिक तणावात आहे. कोणी  किती दिवस प्रतीक्षा करणार?, मला पत्नीकडून घटस्फोट हवा आहे. मात्र सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. ओडिया चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता अनुभव मोहंतीने 2013 मध्ये राजकीय जीवनाची सुरुवात केली होती. 2014 मध्ये त्यांनी वर्षा प्रियदर्शनीसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतर दोघांमध्ये ताण होता. आणि पती-पत्नीमधील संबंध बिघडत होते. 2016 मध्ये पहिल्यांदा अनुभव मोहंतीने आपल्या पत्नीविरोधात याचिका दाखल केली होती, यात त्याने लग्नाच्या दोन वर्षांनंतर पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी देत नसल्याचं सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: actress , marriage , mp
  • First Published :
जाहिरात
जाहिरात