बॉलीवूड स्टार्स केवळ रुपेरी पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप रोमँटिक असतात. बॉलिवूड स्टार्सच्या लव्ह लाईफचे किस्से लोक अनेकदा वाचतात आणि ऐकतात. वैयक्तिक आयुष्यातही त्यांची कहाणी एखाद्या फिल्मी स्टोरीसारखी असलेले अनेकजण आहेत. अभिषेक बच्चनने त्याची प्रेयसी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अनुष्का शर्माला (Anushka Sharma) क्रिकेटर विराट कोहलीने कसे प्रपोज केले ते जाणून घेऊया. (साभार:/Instagram)
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पहिली भेट 2013 मध्ये शॅम्पूच्या अॅडच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर त्यांच्यात जवळीक वाढली. यानंतर दोघे अनेकदा एकत्र दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटर विराट कोहलीने 2015 मध्ये हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर अनुष्का शर्माला प्रपोज केलं होतं. (फोटो क्रेडिट्स: anushkasharma/Instagram)
'गुरु' चित्रपटात काम करताना अभिषेक बच्चनला मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय आवडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाच्या प्रीमियरच्या निमित्ताने त्याने ऐश्वर्याला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. हॉटेलच्या बाल्कनीत त्याने ऐश्वर्याला प्रपोज केले. मात्र, या वेळेस त्याने ऐश्वर्याला दिलेली अंगठी 'गुरू' चित्रपटात वापरण्यात आलेली बनावट अंगठी होती. (फोटो साभार:bachchan/Instagram)
पतौडी नवाब सैफ अली खानने करीना कपूरला एकदा नव्हे तर, तीनदा प्रपोज केलं होतं. दोन वेळांनंतर तिसऱ्यांदा प्रपोज करण्यासाठी सैफने अशी जागा निवडली जिथे करीना नकार देऊ शकली नाही. हे ठिकाण पॅरिस होतं. क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांनी शर्मिला टागोरलाही इथेच प्रपोज केलं होतं, असं सांगितलं जातं. (फोटो क्रेडिट्स:/Instagram/kareenakapoorkhan)
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची लव्हस्टोरीही पूर्णपणे फिल्मी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा अक्षय कुमारने 'मेला' चित्रपटादरम्यान ट्विंकलला प्रपोज केलं होतं, तेव्हा तिने त्याच्या पाठलागापासून सोडवून घेण्यासाठी सांगितलं की, जर त्यांचा चित्रपट फ्लॉप झाला तर, मी होकार देईन. कारण ट्विंकलला तिचा 'मेला' चित्रपट हिट होईल, असा विश्वास होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला आणि अक्षयची प्रेमकहाणी हिट झाली. (फोटो क्रेडिट्स: twinklerkhanna/Instagram)
चित्रपटाच्या पडद्यावर रोमँटिक भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानने गौरीला आपली जीवनसाथी बनवण्यासाठी अतिशय रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले. शाहरुखने गौरीला मुंबईच्या निळ्याशार समुद्रासमोर प्रपोज केले. हे दोघे चांगले मित्र होते आणि बराच काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (फोटो क्रेडिट्स: iamsrk/Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांची लव्हस्टोरी जाणून घ्यायची इच्छा प्रत्येकाला आहे. प्रियांकाच्या वाढदिवसाला निकने अनोख्या पद्धतीने प्रपोज केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांकासाठी अंगठी घेण्यासाठी गेलेल्या निकने लंडनमध्येच टिफनी स्टोअर बंद केलं होतं. दोघांची केमिस्ट्री आजही चर्चेत आहे. (फोटो क्रेडिट्स: priyankachopra/Instagram)
या एपिसोडमधील सर्वांत नवीन जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्टची आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, रणबीर-आलिया बल्गेरियामध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे शूटिंग करत होते. रणबीरने आलियाला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बाहेर जाण्यास सांगितलं आणि तिथे प्रपोज केलं. रणबीर मुंबईत परतल्यावर त्याने इंडस्ट्रीतील काही मित्रांना त्यांच्या या नात्याबद्दल सांगितलं. (फोटो क्रेडिट्स इन्स्टाग्राम @neetu54)