"डान्स करता करता त्यांची जीभ...", पायल घोषनंतर कंगना रणौतने केला धक्कादायक आरोप

जे पायल घोषसह (payal ghosh) झालं तसं आपल्यासहदेखील झालं असं म्हणत कंगना रणौतने (kangana ranaut) धक्कादायक खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) लैंगिक छळाचा आरोप करताच कंगना रणौतनेदेखील (Kangana Ranaut)  याबाबत व्यक्त झाली आहे. पायल घोषप्रमाणेच कंगनानेदेखील अनेक खुलासे केले आहेत. जे पायल घोषसह झाले ते माझ्यासह देखील झालं होतं, असा आरोप कंगनाने केला आहे.

पायल घोषने ट्वीट केल्यानंतर कंगनानेदेखील ट्वीट केलं आहे. त्यामध्ये तिनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बड्या अभिनेत्यांनी आपल्यासह जबरदस्ती केली होती असं कंगना म्हणाली.

कंगना म्हणाली, "अभिनेत्री पायल घोषने जे काही सांगितलं आहे, तसं माझ्यासह अनेक अभिनेत्यांनीही केलं आहे. . बंद व्हॅन किंवा बंद खोलीत ते असं करायचे. पार्टीमध्ये फ्रेंडली डान्स करता करतात अचानक त्यांची जीभ तुमच्या तोंडाजवळ लावायचे. कामासाठी घरी बोलवायचे आणि मग तुमच्यासह जबरदस्ती करायचे"

"बुलिवूडमध्ये लैंगिक भक्षक आहेत. ज्यांचं लग्न फेक, डमी आहे आणि त्यांना दररोज आनंदी राहण्यासाठी एक नवीन हॉट तरुण मुलगी हवी असते. तरुण मुलांसहदेखील ते असंच करतात. माझ्यासह जे काही घडलं होतं, ते मी माझ्या परीने चांगलंच हाताळलं मला मीटूची गरज पडली नाही. मात्र बहुतेक मुलींना याची गरज पडते आहे", असं कंगना म्हणाली.

हे वाचा - दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण?

"अनुराग कश्यपबाबत बोलताना कंगनाने ट्वीट केलं आहे, पायल घोषने जे काही सांगितलं, तसं अनुराग करू शकतो. त्याने आपल्या सर्वच जोडीदारांना फसवलं आहे. तो मोनोगॅमस नाही हे त्याने स्वत:च स्वीकार केलं आहे. अनुरागने पायलसह जे काही केलं, ते बुलिवूडमध्ये सर्रासपणे होतं. स्ट्रगल करणाऱ्या आऊटसायडर मुलींना ते एखाद्या सेक्स वर्करसारखी वागणूक देतात", असं कंगनानं सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: September 20, 2020, 4:36 PM IST

ताज्या बातम्या