जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / व्यायाम करण्याआधी करा 'हे' काम, पावनखिंड फेम अभिनेत्याचा भन्नाट फिटनेस फंडा

व्यायाम करण्याआधी करा 'हे' काम, पावनखिंड फेम अभिनेत्याचा भन्नाट फिटनेस फंडा

व्यायाम करण्याआधी करा 'हे' काम, पावनखिंड फेम अभिनेत्याचा भन्नाट फिटनेस फंडा

अभिनेता अंकित मोहननं एक व्हिडीओ (Ankit mohan instagram)इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. पाहा VIDEO

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : अभिनेता अंकित मोहननं (Ankit mohan)आपल्या अभिनयाच्या बळावर हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंकित (Ankit mohan) सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. अंकित प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. त्याचे जिममधील अनेक व्हिडीओ देखील तो शेअर करत असतो. तरुण मंडळी बॉडी करण्यासाठी अनेक ट्रिक्स आणि टिप्स शोधत असतात. अशातच अंकितनं त्याच्या चाहत्यांना खास फिटनेस फंडा सांगितला आहे. व्यायाम करण्याआधी अशी एक गोष्ट आहे जी अंकित नियमितपणे फॉलो करतो. अंकितनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यानं हा भन्नाट फिटनेस फंडा सांगितलाय.(Ankit Mohan Fitness Mantra) अंकितनं एक व्हिडीओ (Ankit mohan instagram)इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.  अंकितनं त्याच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर एक वर्कआऊट (Ankit mohan workout video)करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याची भरदार बॉडी दिसत आहे. याशिवाय त्याचे सिक्स पॅकही पहायला मिळत आहे. या व्हिडीओला अंकितनं एक खास असं कॅप्शन दिलं आहे. हेही वाचा -  Girija oak: विनाकारण हॉर्न वाजवताय? मग गिरीजानं दिलेल्या भन्नाट उत्तरानं होईल तुमचा अपमान! तरुणांना फिटनेस फंडा देताना अंकित म्हणाला  ‘मी नेहमी व्यायाम करायच्या पहिले हनुमान चालीसा वाचतो आणि माझ्यावर विश्वास ठेवा हे केलात तर आणखी कोणत्याच गोष्टीची मदत घेण्याची गरज भासणार नाही’. अंकितनं व्हिडीओसोबत शेअर केलेल्या या कॅप्शनकडे सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या व्हिडीओवर ‘जय श्री राम’ आणि ‘जय हनुमान’ अशा अनेक कमेंट पहायला मिळत आहे. याशिवाय अनेकांनी व्हिडीओवर लव रिअॅक्ट केलं आहे.

जाहिरात

दरम्यान, अंकित मोहनने ‘फर्जंद’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. अंकितने ‘एमटीव्ही रोडीज’ च्या चौथ्या पर्वात सहभागी होऊन छोट्या पडद्यावर एंट्री केली. ‘फत्तेशीकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’, ‘एक थी बेगम’, ‘महाभारत’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘हैवान’, ‘कुमकूम भाग्य’ या मालिका आणि चित्रपटांतून त्यानं अभिनय करत आपल्या अभिनयाची छाप सोडली. अभिनेता अंकित आणि त्याची बायको रुची हिला सात महिन्याचा मुलगा आहे. त्यांचं नाव रुआन असून तो नेहमीच त्याच्यासोबतही अनेक व्हिडीओे फोटो शेअर करत असतो. नुकतंच अंकितनं रुआनाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये छोटा रुआन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना दिसत होता आणि अंकितनं त्याला उचलून घेतलं होतं. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोवर कमेंट करत अनेकांनी अंकितचं कौतुक केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात