जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Pavitra Rishta 2.0 trailer out: अर्चना- मानवमध्ये 'हा' विलन आणणार दुरावा

Pavitra Rishta 2.0 trailer out: अर्चना- मानवमध्ये 'हा' विलन आणणार दुरावा

Pavitra Rishta 2.0 trailer out: अर्चना- मानवमध्ये 'हा' विलन आणणार दुरावा

‘पवित्र रिश्ता-इट्स नेवर टू लेट’ ही पहिल्या भागाप्रमाणेच एक रोमँटीक आहे. अर्चना आणि मानव यांच्यातील प्रेम आणि कुटुंब अशी एकंदरितच कथा भागातही पाहायला मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 2 सप्टेंबर : छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका ‘पवित्र रिश्ता’चा  (Pavitra Rishta) दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ‘पवित्र रिश्ता-इट्स नेवर टू लेट’ (Pavitra Rishta: its never too late) असं नव्या सीझनचं नामकरण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे लाडके अर्चना – मानव (Archana – Manav) पुन्हा एकदा  त्यांच्या भेटीला येत आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांची केमिस्ट्री मालिकेत तुफान हीट ठरली होती. मात्र यावेळी मानव ही भूमिका अभिनेता शाहीर शेख (Shaheer Shaikh) साकारणार आहे. ‘पवित्र रिश्ता-इट्स नेवर टू लेट’ ही पहिल्या भागाप्रमाणेच एक रोमँटीक आहे. अर्चना आणि मानव यांच्यातील प्रेम आणि कुटुंब अशी एकंदरितच कथा भागातही पाहायला मिळत आहे. नुकताच मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मध्यमवर्गीय कुटुंब आणि त्यांच्यातील विवाद, प्रेम, संवाद पाहायला मिळत आहेत.

जाहिरात

दरम्यान मानवची आई खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे मालितकेत पुढे अर्चना आणि मानवला आणखी संघर्ष करावा लागणार असल्याचं ट्रेलरवरून समजतं आहे. जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी ही भूमिका साकारत आहेत. याशिवाय अभिनेत्री सुमित्रा बांदेकर अर्चनाच्या आईची भूमिका साकारत आहेत. मालिकेविषयी बोलताना अंकिताने म्हटलं की, “क्वचितच कोणी अशा भूमिका करतात ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलतं. माझ्यासाठी ‘पवित्र रिश्ता’ हे प्रोजेक्ट होतं. कारण मला अर्चनाच्या पात्रासाठी प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम अतुलनीय होतं. ही भूमिका पुन्हा साकारण्याची आणि अर्चनाचा वारसा पुढे चालवण्याची संधी मी कशी नाकारली असती?  पवित्र नातेसंबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवल्याबद्दल मी एकता आणि झीची खूप आभारी आहे. मी पुन्हा आर्चूसाठी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यास उत्सुक आहे.” दरम्यान ही मालिका डिझीटल प्लॅटफॉर्मवरच पाहता येणार हे. झी 5 वर ही मालिका पाहता येईल. येत्या 15 सप्टेंबरला मालिकेचा प्रिमियर होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात