मुंबई, 31 मार्च- बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई सुरु झालेली दिसून येत आहे. सध्या अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. परिणीती चोप्रा आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत डिनर डेटवर दिसल्यापासून या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनीही उघडपणे या गोष्टीचा खुलासा केला नसला तरी इंडस्ट्रीतील काही लोकांनी त्यांच्या लग्नाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी परिणीतीला प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खात्री अनेकांना पटली आहे. आता या दोघांच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
दरम्यान आता परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या बातमीवर प्रसिद्ध अभिनेता-गायक हार्डी संधूने शिक्कामोर्तब केला आहे. हार्डी संधू हा परिणीती चोप्राचा चांगला मित्र आहे. त्याने अभिनेत्रीच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब करत तिला नव्या आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच बॉलिवूडमध्ये आणखी एक शाही विवाह सोहळा पार पडणार असल्याचं लक्षात येत आहे. गायक आणि अभिनेता हार्डी संधूने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, परिणीती चोप्रा आपल्या आयुष्यात सेटल होत आहे.अखेर हे घडत असल्याने मला खूप आनंद होत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.
DNA च्या रिपोर्ट्सनुसार, त्यांच्याशी संवाद साधत हार्डी संधूने सांगितलं की, जेव्हा तो तिच्यासोबत 2022 मध्ये आलेल्या स्पाय-थ्रिलर चित्रपट 'कोड नेम: तिरंगा'चं शूटिंग करत होता. तेव्हा सेटवर लग्नाबद्दल आमची चर्चा व्हायची. तेव्हा ती म्हणायची, 'मी तेव्हाच लग्न करेन जेव्हा मला वाटेल की मला योग्य मुलगा सापडला आहे.' आणि आता हे घडलं आहे. मी फोनकरुन परिणीतील शुभेच्छा दिल्याचंही हार्डीने सांगितलं आहे.
याआधी आम आदमी पक्षाचे नेते संजीव अरोरा यांनीदेखील राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन लग्नासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्विट करत लिहलं होतं की, 'राघव आणि परिणीतीचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या जोडीला भरपूर प्रेम, आनंद आणि पाठिंबा मिळो. माझ्या शुभेच्छा''.
दरम्यान एयरपोर्ट परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकत्र दिसून आले होते. यावेळी परिणीतील लग्नाबाबत शुभेच्छा देताना ती लाजली होती. आणि हसत-हसत पापाराझींना प्रतिसाद दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Parineeti Chopra