मुंबई, 13 मे- आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. दरम्यान त्यांच्याबाबत एक खास बातमी समोर आली आहे. आज परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा आपला साखरपुडा उरकणार आहेत. हा कार्यक्रम दिल्लीच्या कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे. साखरपुड्याचा हा शाही सोहळा बॉलिवूड थीमवर आधारित असणार आहे. राघव चड्ढा पवन सचदेवने डिझाइन केलेला पोशाख परिधान करणार आहेत तर परिणीती चोप्रा मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला लेहंगा परिधान करणार आहे. या सोहळ्यांमध्ये इतका पैसा खर्च करणाऱ्या या जोडप्याची एकूण संपत्ती किती हे माहितेय का? आज आपण त्याबाबत जाणून घेऊया. कसा असेल साखरपुड्याचा कार्यक्रम? मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज सायंकाळी 5 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. सर्व विधी पंजाबी चालीरितीने पार पडणार आहेत. सुरुवातील सुखमणी गुरुंचा पाठ, त्यांनतर अरदास आणि नंतर मुख्य साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडेल. नंतर शाही जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. साखरपुड्यासाठी कुटुंबातील लोक बॉलिवूड-राजकीय क्षेत्रातील जवळचे लोक उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात एकूण 150 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि प्रियांका चोप्रा यांच्यासह राजकारण आणि बॉलिवूडमधील अनेक बड्या व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. (हे वाचा: Parineeti-Raghav Engagement: परिणीती-राघवचा आज साखरपुडा, हे असणार बॉलिवूड-राजकीय पाहुणे; शाही भोजनात कायकाय? ) परिणीती चोप्राची संपत्ती- परिणीती चोप्रा सध्या फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी तिने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. बॉलिवूडमधील आघाडीच्या नायिकांमध्ये तिचं नाव घेतलं जातं. चित्रपट फ्लॉप झाले तरी तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. हरियाणातील अंबाला याठिकाणी जन्मलेल्या परिणीती चोप्राने लंडनमधून उच्चशिक्षण घेतलं आहे. परिणीती चोप्रा बारावीमध्ये देशातील टॉपर आहे. परिणीती चोप्रा चित्रपटांमधून आणि जाहिरातींमधून बक्कळ पैसा कमावते. शिवाय ती अनेक रिऍलिटी शोसुद्धा जज करते. अभिनेत्रीकडे एकूण 60 कोटींची संपत्ती असल्याचं सांगितलं जातं. शिवाय तिच्याकडे मुंबईत आलिशान सी फेसिंग फ्लॅटसुद्धा आहेत. अभिनेत्रीकडे ऑडी, जॅग्युआर, मर्सिडीज असं महागडं कार कलेक्शन आहे.
राघव चड्ढा संपत्ती- राघव चड्ढा हा सर्वात कमी वयाचे राज्यसभा सदस्य आहेत. राघव चड्ढा आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात.राघवकडे परिणीतीपेक्षा कमी संपत्ती असली तरीसुद्धा ती सर्वसामान्यांच्या तुलनेत जास्तच आहे. राघवकडे 37 लाखांचा आलिशान बंगला आहे. 90 तोळे सोनेसुद्धा आहे. शिवाय आलिशान कारही आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, राघवकडे 14 लाख 57 हजार रुपये आहेत. शिवाय मोठा लाईफ इन्शुरन्ससुद्धा आहे. राघवने साडे 6 लाख रुपये काही योजनांमध्ये गुंतवले आहेत.