आजचा दिवस बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढासाठी फारच खास आहे. कारण आज या दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या साखरपुड्याची आणि लग्नाची चर्चा रंगली आहे. आज अखेर तो आनंदाचा क्षण आला आहे.
परिणीती चोप्रा बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय सेलिब्रेटी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये करण जोहरच्या नावाचासुद्धा समावेश आहे.
शिवाय राघव चड्ढाकडून अनेक राजकीय लोकही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये सर्वात आधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नावाचा समावेश आहे.
साखरपुड्यातील भोजनाबाबत सांगायचं तर, हा मेन्यू फारच खास असणार असं सांगितलं जात आहे. यामध्ये नेमके कोणते पदार्थ असणार हे अद्याप समोर आलेलं नाहीय.
बॉलिवूड-हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा आपल्या बहिणीच्या साखरपुड्यामध्ये सहभागी होण्यासाठी पती आणि मुलीसोबत भारताला रवाना झाली आहे.