VIDEO : रणवीर सिंहला सर्वांसमोर ओरडली अनुष्का शर्मा, चाहते का देतायत शाबासकी

रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही नुकतीच एल ब्युटी अवॉर्डला हजेरी लावली. या अवॉर्ड फंक्शनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2019 12:05 PM IST

VIDEO : रणवीर सिंहला सर्वांसमोर ओरडली अनुष्का शर्मा, चाहते का देतायत शाबासकी

मुंबई, 09 ऑक्टोबर : रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांच्या मैत्रीविषयी तर सर्वांनाच माहित आहे. त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रिन केमिस्ट्री सुद्धा कोणापासून लपून राहिली नव्हती. पण नुकत्याच एका इव्हेंटमध्ये एका प्रश्नाचं उत्तर विचारायला अनुष्का शर्माकडे गेलेल्या रणवीर सिंहला तिच्याकडून असा ओरडा मिळाला की तो आल्या पावलीच स्टेजवर परत गेला. रणवीर आणि अनुष्काचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे खूप व्हायरल होत आहे आणि अनुष्काच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून तिला शाबासकी मिळत आहे.

रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही नुकतीच एल ब्युटी अवॉर्डला हजेरी लावली. या अवॉर्ड फंक्शनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंह स्टेज काहीतरी बोलताना दिसत आहे. रणवीर या ठिकाणी यशाचा अर्थ आणि प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचं काय महत्त्व आहे यावर बोलताना दिसत आहे. अचानक तो स्टेजवरुन खाली उतरतो आणि हातात माइक घेउन अनुष्काच्या समोर जातो आणि म्हणतो, 'चला ब्यूटीफुल आणि टॅलेंटेड अनुष्का शर्माला विचारुयात की तिच्यासाठी यशाचा अर्थ काय आहे.'

अमिताभ बच्चन यांचं खरं नाव 'इन्कलाब'? बिग बींनी स्वतः सांगितलं सत्य

Loading...

 

View this post on Instagram

 

Great capture by @nenekedarnene for #ellebeautyawards of #ranveersingh and #anushkasharma @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रणवीर जसा अनुष्काकडे माइक देतो तशी अनुष्का म्हणते, 'रणवीर तु होस्ट नाही आहेस.' हे ऐकल्यावर रणवीर लगेचच तिथून निघून जातो आणि जाता जाता तो अनुष्काची माफी सुद्धा मागतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेक चाहते अनुष्काच्या या कृतीचं कौतुक करत आहेत. तिनं रणवीरला दम भरला हे चांगलच केलं असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

इलियाना डिक्रुझनं शेअर केला हॉट बिकिनी फोटो, चाहते म्हणाले...

रणवीर सिंहनं त्याच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात अनुष्का शर्मासोबत 'बँड बाजा बारात' या सिनेमातून केली होती. या सिनेमानंतर हे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जात होतं. मात्र या दोघांनी हे नातं कधीच मान्य केलं नव्हतं. शेवटी 2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केलं. 2018 मध्ये रणवीर दीपिका पदुकोणसोबत लग्नाच्या बेडीत अडकला. बँड बाजा बारात व्यतिरिक्त ही जोडी 'लेडीज वर्सेज रिकी बहल' आणि 'दिल धड़कने दो' या सिनेमातही एकत्र दिसली होती.

शाहरुख खानसोबत सिनेमात कधी दिसणार मुलगा अबराम, ट्वीटरवर केला खुलासा

==================================================================

मुंबईसह उपनगरात तुफान पाऊस, हवामान खात्याने दिला 'हा' इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...