मुंबई, 25 मार्च- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी-दहिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दिव्यांकाची गणती टीव्हीवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून इशिताच्या रुपात दिव्यांकाने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. दिव्यांकाचा मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री सतत आपल्या व्हिडीओ आणि पोस्टमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते. आताही असंच काहीसं झालं आहे. मात्र यावेळी दिव्यांकाचा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले आहेत. शिवाय दिव्यांका आपला रोष व्यक्त करत आहेत.
'ये है मोहब्बतें', 'बनू मैं 'तेरी दुल्हन' अशा लोकप्रिय मालिकांमधून दिव्यांका त्रिपाठी-दहिया घराघरात पोहोचली आहे. दिव्यांकाचा हसरा चेहरा आणि अप्रतिम अभिनयाचे लाखो चाहते आहेत. मालिका आणि सोशल मीडिया दोन्हीवर दिव्यांकाला लोकांचं भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद मिळत असतो. अभिनेत्री टीव्हीवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. असं म्हटलं जात की, दिव्यांका तिच्या मालिकेतील अभिनेत्यापेक्षाही जास्त मानधन आकारत होती.
(हे वाचा:Sonu Nigam: सोनू निगमच्या वडिलांच्या घरी चोरी करणारा अटकेत; कोल्हापूरातून जप्त केले 70 लाख )
दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सध्या ती छोट्या पडद्यावरून गायब असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या दैनंदिन अपडेट्स देत असते. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहात असतात. अभिनेत्री सतत व्हेकेशन एन्जॉय करताना आणि कुटुंबासोबत मजामस्ती करताना दिसून येते. दरम्यान दिव्यांकाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. परंतु या व्हिडीओमुळे अभिनेत्री आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
View this post on Instagram
दिव्यांकाने नुकतंच आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने भूकंप आला असल्याचं सांगितलं आहे. व्हिडीओ शेअर करत दिव्यांकाने म्हटलंय, 'सध्या इथे भूकंप आला आहे. आम्ही सर्वजण घराच्या बाहेर येऊन थांबलो आहोत. सर्व गल्लीतले लोकही बाहेर जमा झाले आहेत. मी खूप उत्सुक आहे. कारण मी माझ्या आयुष्यातील पहिला भूकंप अनुभवत आहे. हे खूपच उत्सुकात्मक असल्याचं सांगत अभिनेत्री हसू लागली.दिव्यांकाच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ आता टेलीचक्करने शेअर केला आहे.
हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोक दिव्यांकावर भडकले आहेत. कमेंट्स करत अभिनेत्रीवर नाराजी व्यक्त करत आहेत. एकाने कमेंट करत लिहलंय, 'वेडी आहेस का,भूकंपामध्ये उत्सुक होण्यासारखं काय आहे, जीवही जाऊ शकतो', तर दुसऱ्याने लिहलंय, टर्कीमध्ये लोकांची कशी अवस्था झालेली, माहिती आहे का ही मनोरंजनाची गोष्ट नाहीय. तर आणखी काहींनी लिहलंय, 'जराही डोकं नाही का भूकंपाचा लाईव्ह व्हिडीओ टाकत, कोण आनंद व्यक्त करतं?'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake, Entertainment, Tv actress