मुंबई, 9 मे- प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालंय. मात्र, पलकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिची आई श्वेता तिवारीचं यश आणि संघर्ष याबद्दल सांगितलं आहे. श्वेता तिवारी ही भारतातील सर्वांत लोकप्रिय टेलिव्हिजन कलाकारांपैकी एक आहे. पण तिचा हा प्रवास खूपच संघर्षमय होता. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान पलक तिवारीनं अलीकडेच श्वेता तिवारीच्या संघर्षमय दिवसांबद्दल मोठा खुलासा केलाय. पलक तिवारी म्हणाली, ‘जेव्हा माझ्या आईनं करिअरला सुरुवात केली, तेव्हा ती एका चाळीतील खोलीमध्ये राहत होती. तेव्हा माझ्या आईसोबत तिचे वडिल, आई, भाऊ राहत होते.’ दरम्यान, श्वेता तिवारी ही ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकेमुळे प्रसिद्ध झाली, या मालिकेत तिनं प्रेरणा शर्माची भूमिका केली होती. एकता कपूर निर्मित ही मालिका 2001 ते 2008 पर्यंत सुरू होती. दोनदा लग्न झालं पण… (हे वाचा: Chandrika Saha: धक्कादायक! अभिनेत्रीच्या पतीने स्वतःच्या च मुलाला केली मारहाण;जखमी अवस्थेत आहे 15 महिन्यांचा चिमुकला ) श्वेता तिवारीचं वैयक्तिक आयुष्य खूपच संघर्षमय राहिलं. वर्ष 1998 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी तिनं राजा चौधरीशी लग्न केलं. त्यानंतर वर्ष 2000 मध्ये तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, श्वेताचं पहिलं वैवाहिक जीवन आनंदी नव्हतं. अखेरीस तिनं तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला, व तिचा व राज चौधरी यांचा 2007 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर, श्वेता अभिनव कोहलीच्या प्रेमात पडली, व या दोघांनी लग्न केलं. या जोडप्यानं 2016 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. मात्र, श्वेता तिवारीच हे लग्नदेखील अडचणीत आलं. ऑगस्ट 2019 मध्ये श्वेतानं पहिल्यांदा अभिनव कोहलीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि तिच्या मुलीचा छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.
न्यायालयापर्यंत गेली होती लढाई- अभिनव कोहलीनं नंतर श्वेतावर मुलगा रेयांशला भेटू देत नसल्याचा आरोप केला. या दोघांची लढाई न्यायालयापर्यंत गेली, आणि ती श्वेतानं जिंकली. त्यावेळी श्वेता म्हणाली होती, ‘मला हेच हवं होतं, मी या निकालावर समाधानी आहे. गेल्या दोन वर्षांपासून अभिनव माझा सतत पाठलाग करत होता. त्याने माझ्यावर आरोप केला आहे की, मी रेयांशचं अपहरण केलं आणि त्याला त्याच्यापासून दूर ठेवलं; पण माझ्याकडे पुरावे आहेत की, प्रत्येकवेळी अभिनवला रेयांश कुठे आहे, याची माहिती होती. ‘खतरों के खिलाडी’च्या शूटिंगदरम्यानही रेयांशच्या मुक्कामाबाबत त्याला माहिती होती.’