जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Chandrika Saha: धक्कादायक! अभिनेत्रीच्या पतीने स्वतःच्या च मुलाला केली मारहाण;जखमी अवस्थेत आहे 15 महिन्यांचा चिमुकला

Chandrika Saha: धक्कादायक! अभिनेत्रीच्या पतीने स्वतःच्या च मुलाला केली मारहाण;जखमी अवस्थेत आहे 15 महिन्यांचा चिमुकला

चंद्रिका साहाच्या पतीने बाळाला केलं जखमी

चंद्रिका साहाच्या पतीने बाळाला केलं जखमी

Chandrika Saha Husband Case: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीवर स्वतःच्याच चिमुकल्या मुलाला मारहाण करुन जखमी केल्याचा आरोप लागला आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 मे- मनोरंजनसृष्टीत सतत काही ना काही धक्कादायक घटना घडतच आहेत. दरम्यान आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीवर स्वतःच्याच चिमुकल्या मुलाला मारहाण करुन जखमी केल्याचा आरोप लागला आहे. या अभिनेत्याने आपल्या अवघ्या 15 महिन्यांच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करत त्याला गंभीर जखमी केलं आहे. ही अभिनेत्री इतर कुणी नसून छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा चंद्रिका साहा आहे. चंद्रिका साहा आपल्या पतीसोबत मुंबईतील बांगूर नगर या परिसरात राहते. तिचा पती अमन मिश्रा याच्यावर आरोप लागला आहे की, त्याने आपल्या स्वतःच्या अवघ्या 15 महिन्यांच्या मुलाला मारहाण करत जखमी केलं आहे. त्याने हा प्रकार आपल्या वरच्या मजल्यावरील बेडरुममध्येच केला आहे. (हे वाचा: प्रेम ठरलं घातक, मुलांनीच केलेला अभिनेत्रीचा खून; ‘हीर रांझा’ फेम प्रिया राजवंशचा थरकाप उडवणारा शेवट ) अमन मिश्रा याच्याविरोधात बांगूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रिका साहाच्या जखमी बाळाला मलाड येथिक एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सुदैवाने सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रिका साहाने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. घरामध्ये आपलं बाळ जखमी अवस्थेत आढळून आल्यांनतर चंद्रिकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिलं असता तिला धक्का बसला. कारण तिच्या पतीनेच मुलाला अमानुष मारहाण केली आहे. अभिनेत्रीने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजसह पोलिसांशी संपर्क साधत हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

चंद्रिका साहाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचा पती अमन मिश्रा त्यांच्या मुलाच्या जन्माने अजिबात खुश नव्हता. काल अभिनेत्रीला आपल्या घरी आपलं मुल जखमी अवस्थेत आढळून आलं. अभिनेत्रीने आपल्या बेडरुममधील सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला असता, तिला धक्का बसला. कारण बाळ रडत असल्याचं बघून तिच्या पतीने त्याला एक दोन नव्हे तब्बल तीनवेळा मारहाण केली होती. अभिनेत्रीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात