• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • अंकिता लोखंडेसाठी 'या' दोन मराठी अभिनेत्री करताहेत केळवणचा प्लान

अंकिता लोखंडेसाठी 'या' दोन मराठी अभिनेत्री करताहेत केळवणचा प्लान

टेलिव्हिजनची लाडकी बहू आणि बॉलिवुड अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील (Ankita Lokhande) बोहल्यावर चढणार आहे.

  • Share this:
मुंबई, 20 नोव्हेंबर: सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनी लग्नगाठ बांधली. कतरिना कैफ-विकी कौशल यांच्या लग्नाबाबतही जोरदार चर्चा आहेत. या लगीनघाईमध्ये टेलिव्हिजनची लाडकी बहू आणि बॉलिवुड अभिनेत्री अंकिता लोखंडे देखील (Ankita Lokhande) बोहल्यावर चढणार आहे. अंकिता आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैन (Vicky Jain) येत्या डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहेत. त्यापूर्वी अंकिताच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अंकितानं आपल्या मैत्रिणींसाठी खास बॅचलर पार्टीचं (bachelorette party) आयोजन केलं होतं. या पार्टीनंतर तिच्या मैत्रिणींनी देखील तिच्यासाठी काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) अंकितासाठी पारंपरिक पद्धतीने केळवण आयोजित करणार आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
एका ओटीटी (OTT) शोच्या शूटिंगदरम्यान अभिज्ञा भावे आणि अंकिता लोखंडेची ओळख झाली होती. आता दोघी एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या बॅचलर पार्टीमध्ये देखील अभिज्ञा होती. अभिज्ञानं अमृता खानविलकरच्या सोबतीनं अंकितासाठी केळवण आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकिताला तशी तिनं कल्पनाही दिली आहे. हे ऐकून अंकिताला आनंद झाला असल्याचं अभिज्ञा म्हणाली. हेही वाचा- हिवाळ्यात तुम्हीही दिसाल Beauty क्विन, फॉलो करा या सोप्या 5 स्टेप्स अंकिता इंदूरमधील शहरी वातावरणात वाढलेली असली तरी तिला महाराष्ट्रातल्या परंपरांबद्दल प्रचंड आकर्षण आहे. पुढच्या महिन्यात तिचं लग्न होणार आहे. तिच्या घरात लग्नाआधीच्या विविध विधींना (Pre wedding rituals) सुरुवात झाल्यानं सध्या ती व्यग्र झाली आहे. यामुळे तिला केळवण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास वेळ मिळाला नाही, तर लग्नानंतर तिच्यासाठी खास मेजवानी आयोजित करण्याचा विचारही अभिज्ञा करत आहे. अभिज्ञा भावेनं अंकिता आणि विकीच्या जोडीबद्दलही आपलं मत व्यक्त केलं. 'मी रिझर्व्ह स्वभावाची व्यक्ती आहे, विशेषतः कामाच्या ठिकाणी तर मी कुणासोबत पटकन मिसळत नाही; मात्र अंकिताने मला बोलं करण्यासाठी पुढाकार घेतला. आता आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी झालो आहोत. मी विकीलाही भेटले आहे. त्या दोघांची जोडी खूप छान जमेल,' असं अभिज्ञा म्हणाली. अंकिताला वर्तमानात जगायला आवडतं. स्वत:च्या बॅचलर पार्टीमध्येदेखील तिनं खूप मस्ती केली. केक कापताना तिनं डीजेला 'दिन शगना दा' हे गाणं वाजवण्याची विनंती केली. त्यानंतर 'मैं ससुराल नही जाउंगी'सारख्या गाण्यांवर धमाल डान्सही केला, असंही अभिज्ञानं सांगितलं. हेही वाचा-  आर्मीत भरती होण्याचं स्वप्न राहिलं अधुरचं, बाईक घसरली; मागून येऊन ट्रकनं चिरडलं अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता आणि विकी रिलेशनशिपमध्ये होते. येत्या डिसेंबर महिन्यात 12, 13 आणि 14 या तारखांना अंकिता आणि विकीचा लग्नसमारंभ पार पडणार आहे. दोघेही जैन पद्धतीनं लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
Published by:Pooja Vichare
First published: