Home /News /entertainment /

दिलीप कुमार यांचं घर पाकिस्तान घेणार ताब्यात; कारवाईला केली सुरुवात

दिलीप कुमार यांचं घर पाकिस्तान घेणार ताब्यात; कारवाईला केली सुरुवात

पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतिय सरकार ने बॉलीवूड चे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि दिवंगत अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांच्या पूर्वजांच्या घरांना औपचारिक ताब्यात घेण्याची प्रक्रिया स्थानिक सरकारने सुरू केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई 7 मे : बॉलिवूडचे (Bollywood) अनेक प्रसिद्ध नायक , नायिका यांच थेट संबंध हा पाकिस्तानशी आहे . अनेकांचे पूर्वज हे पाकिस्तानातले होते. तर काहींचा जन्म हा पाकिस्तानातला आहे. पण कालांतराने त्यांनी भारतालाच मायभूमी मानलं. यात बॉलिवूडच्या प्रसिद्ध घराण्याचा म्हणजेच कपूर कुटुंबाचा (Kapoor family) समावेश आहे. तर अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचाही समावेश आहे. यांची आजही पाकिस्तानात मालमत्ता आहे. पण या मालमत्तेला पाक सरकारने आता आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांतिय सरकार ने बॉलीवूड चे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि दिवंगत अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांच्या पूर्वजांच्या घरांना औपचारिक ताब्यात घेण्याची प्रक्रिया स्थानिक सरकारने सुरू केली आहे. सरकार या शहराच्या मधोमध स्थित असणाऱ्या राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या घरांचं (Raj Kapoor and Dilip Kumar's Ancestral Homes) संग्रहालयांत रूपांतरित करणार आहे.यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. पेशावर चे उपायुक्त खालिद महमूद यांनी बुधवारी ऐतिहासिक इमारतींच्या वर्तमान मालकांना अंतिम नोटिस पाठवली आहे. या घराचे वर्तमान मालक हे खैबर पख्तूनख्वा (केपी) सरकार द्वारा निर्धारित हवेलींच्या  किमतींवर प्रश्न उपस्थित करू शकतात. स्थानिक सरकार कडे किंवा न्यायालयात घरांच्या किमतीत वाढ करण्याचे आदेश देऊ शकतात. आधी स्थानिक सरकार ने राज कपूर यांची  6.25-मारला आणि  दिलीप कुमार यांची चार- मारला हवेलींची किंमत क्रमशः 1.50 करोड रुपये आणि 80 लाख रुपये निश्चित केली होती. सरकार ने दोन्ही हवेलींना संग्रहालयांत बदलण्याची योजणा आखली होती. मारला भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशात जमीन मोजण्याचं एक ट्रेडिशनल एकक आहे. एक मारला म्हणजे 272.25 स्के. फुट , जे 25.2924,000 मीटर इतके असतात. अशात राज कपूर यांच्या हवेलीच्या वर्तमान मालिकाने अली कादिर यांनी हवेलीची किंमत 20 करोड सांगितली आहे, तर दिलीप कुमार यांच्या हवेलीचे मालक गुल रहमान मोहम्मद यांच म्हणणं आहे की, सरकार ने हवेली 3.50 करोड या बाजार दराने खरेदी केली पाहिजे.
    Published by:News Digital
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Raj kapoor

    पुढील बातम्या