'आता मला शिव्या खायला तयार राहावं लागणार', अभिनेता शशांक केतकरने नेमकं केलं तरी काय?

'आता मला शिव्या खायला तयार राहावं लागणार', अभिनेता शशांक केतकरने नेमकं केलं तरी काय?

मराठी पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर एका मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पाहिले न मी तुला’ असं या नव्या मालिकेच नाव आहे. मात्र अभिनेता असणारा शशांक या मालिकेतून प्रथमच निगेटिव्ह रोल साकारणार आहे

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : मराठी पडद्यावरचा आणि रंगभूमीवरचा प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर (shashank ketkar) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. त्याने नुकताच एक VIDEO शेअर करत लिहिलं आहे की, "आता मला शिव्या खाव्या लागणार". शशांक सध्या काय करतोय आणि त्याच्या या पोस्टचा अर्थ काय?

शशांक झी टीव्हीवर एका नवीन मालिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पाहिले न मी तुला’ असं या नव्या मालिकेच नाव आहे. मात्र आतापर्यंत हीरोच्या भूमिकेत पाहिलेल्या शशांकला या मालिकेतून प्रथमच निगेटिव्ह रोल साकारणारताना पाहावं लागणा आहे. एका अभिनेत्यासाठी ही खूप मोठी बाब आहे, असं शशांक सांगतो.

आपल्या Instagram वर शशांकने मालिकेचा टिझर शेअर करत त्याच्याखाली लिहिलं आहे. ‘आता मला शिव्या खायला तयार रहावं लागणार आहेत. एक अभिनेता म्हणून फार कमी वेळा असे एक्सपिरीमेंट करायला मिळतात.' या संधी बद्दल त्याने झी वाहिनेचे आभारही मानले आहेत.

शशांक हा मराठी मालिकांमध्ये एक प्रसिद्ध अभिनेता मानला जातो. झी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमधून ‘श्री’ हे पात्र साकारत तो घराघरात पोहोचला.

(हे पहा :  अभिनेत्रीने शाळेच्या वॉचमन काकांसोबत केला डान्स; काही क्षणात VIDEO झाला VIRAL )

शशांकने ऑस्ट्रेलियातील सिडनी इथे इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. सिडनीत असताना शशांक मराठी नाटक आणि सांस्कृतिक ग्रुपमधून गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत होता. इंजिनीअरींग फिल्डमध्ये नोकरीही केली. त्यानंतर शशांक भारतात परतला आणि त्याने आपलं करिअर मराठी मालिकांकडे वळवलं. ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका प्रेक्षकांना खूपच पसंत आली.

शशांकने या मालिकेतील सहअभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या सोबत लग्न देखील केलं होत. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. या नात्यामुळेही शशांक मोठ्या चर्चेत आला होता. त्यांनतर शशांकने दुसरं लग्नदेखील केलं.आणि नुकताच तो बाबा देखील झाला आहे. एक अभिनेता म्हणून शशांक नेहमीच प्रेक्षकांना भावलाय आता या निगेटीव्ह व्यक्तिरेखेतून शशांक प्रेक्षकांना कसा वाटतो, हे बघणं महत्त्वाचं ठरेल.

Published by: Aiman Desai
First published: February 24, 2021, 5:48 PM IST

ताज्या बातम्या