• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • समरच्या अहंकारापुढे लागेल का मनू-अनिच्या प्रेमाचा टिकाव; पाहिले नं...मालिकेत नवा ट्वीस्ट

समरच्या अहंकारापुढे लागेल का मनू-अनिच्या प्रेमाचा टिकाव; पाहिले नं...मालिकेत नवा ट्वीस्ट

झी मराठीवरील ‘पाहिले नं मी तुला’ मालिकेने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 जून- ‘पाहिले नं मी तुला’ (Pahile Na Mi Tula) मालिकेत समर (Samar) मनू (Manu) आणि अनिकेतच्या (Aniket) संसारात सतत अडचणी उभारण्याचं काम करत आहे. त्या दोघांना सुखाने संसार करूच द्यायचा नाही असा चंग समरने बांधला आहे. मनूच्या स्वाभिमानी वागण्याने समरच्या अहंकाराला मोठी ठेच लागली आहे. आणि म्हणूनचं मनू आणि अनिकेतला वेगळा करण्याची एकही संधी समर सोडत नाहीय.
  झी मराठीवरील ‘पाहिले नं मी तुला’ मालिकेने चाहत्यांच्या मनाचा ताबा मिळवला आहे. प्रेक्षक मालिकेच्या प्रत्येक भागासाठी खुपचं उत्सुक असतात. मनू आणि अनिकेतचं आतोनात प्रेम आणि समरची त्यांच्या संसारात चाललेली ढवळाढवळ पाहण्यासाठी चाहते खुपचं उत्सुक असलेले पाहायला मिळतात. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा अजूनचं वाढली आहे. नव्या प्रोमोमध्ये समर आपल्या अहंकाराला ठेच लागल्याचं स्वतःशीचं बोलत आहे. आणि ही ठेच मनूमुळे लागली असल्याचंही तो म्हणत आहे. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत मनूने आपल्या स्वामिनामुळे त्याच्या अहंकाराचा चुराडा केला आहे. आणि म्हणूनचं समर तिच्याशी बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. (हे वाचा;HBD: अभिनयासोबतच उत्कृष्ट गायकही आहे 'देवमाणूस'ची डिम्पल; पाहा अस्मिता देशमुखचा ) म्हणूनचं समर तिचं स्वाभिमान तिचं प्रेम अनिकेतला त्याच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या संसारामध्ये दररोज नवं वादळ आणण्याचं काम तो करत आहे. मात्र मनू आणि अनिकेतचं प्रेम इतक अफाट आहे, की समरकडून आलेल्या प्रत्येक अडचणीला ते ताकतीने तोंड देत आहेत. त्यामुळेच समरचा अहंकार जिंकणार की मनू आणि अनिकेतचं प्रेम असचं वरचढ चढणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ‘पाहिले नं मी तुला’ चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. मनू आणि अनिकेतच्या आयुष्यात असणाऱ्या समर नावाच्या वादळाने आणि त्याहूनही अफाट असणाऱ्या या दोघांच्या प्रेमाने चाहत्यांना खिळवून ठेवलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: