जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'तारक मेहता..'फेम 'बबिता-टप्पू'चा खास फोटो झाला VIRAL; पुन्हा अफेयर्सच्या चर्चांना उधाण

'तारक मेहता..'फेम 'बबिता-टप्पू'चा खास फोटो झाला VIRAL; पुन्हा अफेयर्सच्या चर्चांना उधाण

'तारक मेहता..'फेम 'बबिता-टप्पू'चा खास फोटो झाला VIRAL; पुन्हा अफेयर्सच्या चर्चांना उधाण

सब टीव्हीवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच भुरळ घातली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,24ऑक्टोबर- टीव्हीवरील विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा**’(Tarak Mehata Ka Oolta Chashmah)** गेली १३ वर्षे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रचंड लोकप्रिय झालं आहे. मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता**(Munmun Dutta)** नेहमीच चर्चेत असते. कधी ती आपल्या लूकमुळे तर कधी आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेली अनेक दिवस मुनमुन दत्ता मालिकेतील टप्पू अर्थातच राज अनादकतला**(Raj Anadakat)** डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नुकताच समोर आलेल्या दोघांच्या एका फोटोमुळे या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

जाहिरात

सब टीव्हीवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच भुरळ घातली आहे. तब्बल १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र चाहत्यांना तोंडपाठ झालं आहे. ही सर्व पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहेत. मालिकेत असच एक पात्र आहे ते म्हणजे ‘बबिता’. ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री मुनमुन दत्ताने. तिने आपल्या सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने या मालिकेत चार चाँद लावले आहेत. तिच्या खाजगी आयुष्याबद्दल नेहमीच प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडत. ती सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून दाद देत असतात. मात्र नुकताच मुनमुन दत्ताच्या फॅनपेजवर तिचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये ती मालिकेतील टप्पू अर्थातच अभिनेता राज अनादकतसोबत दिसून येत आहे. या फोटोमध्ये दोघांनी हातात-हात घालून पोझ दिली आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. हा फोटो व्हायरल होताच राज आणि मुनमुनच्या अफेयरबद्द पुहा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.या फोटोवर युजर्स भरभरून कमेंट्स करत आहेत. काहींनी ही जोडी आवडल्याचं म्हंटल आहे. तर काहींनी या दोघांमध्ये असलेल्या वयाच्या अंतरामुळे दोघांना ट्रोल केलं आहे. (हे वाचा: ' तारक मेहता…’ फेम बबिताजी मुनमुन दत्ता 9 वर्षांनी लहान असणाऱ्या .. . ) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मुनमुनने एक फोटो शेअर केला होता. त्यांनतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या दोघांचे फोटो व्हायरल होत होते. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत मिम्सचा महापूरच आला होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र या दोघांचा फोटो व्हायरल होताच, पुन्हा एकदा त्यांच्या अफेयर्सच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात