बहुप्रतीक्षित ऑस्कर पुरस्कार सोहळा काल अखेर पार पडला. यंदाचा हा सोहळा भारतासाठी फारच खास ठरला. (फोटो क्रेडिट- ANI ट्विटर)
एसएस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमामधील 'नाटो नाटो' या गाण्यासाठी ऑस्कर प्रदान करण्यात आला तर दुसरीकडे कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित आणि गुनीत मोंगा निर्मित 'द एलिफंट व्हिस्पर्स' या लघुपटासाठीही ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे.
'द एलिफंट व्हिस्पर्स' ही दक्षिणेच्या जंगलात राहणाऱ्या एका जोडप्याची सत्यकथा आहे ज्यांनी एका हत्तीच्या पिलाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं आहे.
या जोडप्याने आपल्या हत्तीचं नाव 'रघु' असं ठेवलं आहे. ते अक्षरशः त्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतात.