मुंबई 26 एप्रिल: स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा अनेक ठिकाणी केल्या जातात. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना समान स्थान मिळायला हवं अशी भाषणं ऑस्कर (Oscars 2021) पुरस्कार सोहळ्यातही केली जातात. तरी देखील ऑस्करमध्ये स्त्री कलाकारांना दुह्यम स्थान दिलं जातं असा आरोप वारंवार केला जायचा. अर्थात हा आरोप काही अंशी खरा देखील होता. कारण गेल्या 92 वर्षांच्या इतिहासात केवळ एकाच स्त्री कलाकाराला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. परंतु यंदाच्या वर्षी क्लोई झाओनं (Chloe Zhao) आपल्या जबरदस्त कलाकृतीनं ऑस्करची ही परंपरा मोडून काढली. तिनं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरत एक नवा इतिहास रचला. (Chloe Zhao creates history)
अवश्य पाहा - Oscar जिंकणाऱ्या कलाकारांना किती रुपयांचं बक्षिस मिळतं?; रक्कम पाहून व्हाल थक्क
It's official! #Oscars pic.twitter.com/EjlbzePvqR
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
अॅकेडमीच्या इतिहासात ऑस्करवर नाव कोरणारी क्लोई आजवरची दुसरी स्त्री दिग्दर्शिका ठरली आहे. तिला नोमोलँड या चित्रपटासाठी ऑस्कर मिळाला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे क्लोईनं दिग्दर्शित केलेल्या नोमोलँडला एकूण सहा विभागांमध्ये नामांकन मिळालं होतं. त्यापैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या तीन पुरस्कारांवर नाव कोरलं. तिनं केलेल्या या विक्रमासाठी जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिच्या कर्तृत्वामुळं जगभरातील स्त्रियांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल असं म्हटलं जात आहे. यापूर्वी 2010 साली केथरिन बिगेलो हिनं हर्टलॉकर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या विभागात ऑस्कर पटकावला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Movie review, Oscar, Oscar award, Oscar award show