मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: देवदूत Sonu Sood, अपघातातल्या जखमी तरुणाला स्वतः उचलून नेलं रुग्णालयात

VIDEO: देवदूत Sonu Sood, अपघातातल्या जखमी तरुणाला स्वतः उचलून नेलं रुग्णालयात

अभिनेता सोनू सूद   (Sonu Sood)  हा लोकांसाठी एक देवदूत बनला आहे. गेली दोन वर्षे तो ज्या प्रकारे लोकांना मदत करत आहे, कित्येक लोक त्याला देवाचा दर्जा देत आहेत.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 9 फेब्रुवारी- अभिनेता सोनू सूद   (Sonu Sood)  हा लोकांसाठी एक देवदूत बनला आहे. गेली दोन वर्षे तो ज्या प्रकारे लोकांना मदत करत आहे, कित्येक लोक त्याला देवाचा दर्जा देत आहेत. आणि म्हणूनच त्याला रिअल लाईफ हिरो म्हटलं जात आहे. नुकतंच सोनूने असं काही केलं की त्यामुळे लोक पुन्हा एकदा त्याचं प्रचंड कौतुक करत आहेत. पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील कोटकपुरा बायपासजवळ एक अपघात झाला होता. दोन वाहनांच्या धडकेत एक व्यक्ती जखमी झाला, त्याला स्वतः सोनू सूदने आपल्या मांडीवर घेऊन वाचवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. सोनू सूदच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. कोटकपुराबायपासजवळ दोन वाहनांची भीषण धडक झाली होती. अपघातानंतर काही वेळातच सोनू सूद तेथून जात होता. अपघात पाहून तो स्वत:ला थांबवू शकला नाही आणि गाडी थांबवून जखमी व्यक्तीच्या मदतीसाठी धावला. सोनूसोबत उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच्या मदतीने जखमी व्यक्तीला आधी त्याच्या मांडीवर उचलून गाडीतून बाहेर काढलं आणि नंतर त्याच्या गाडीत बसवून रुग्णालयात नेलं. जिथे आता त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
सोनू सूदच्या या उत्कृष्ट कामाचं चाहते प्रचंड कौतुक करत आहेत. सोनू बॉलिवूडमधील असा एक अभिनेता आहे ज्याच्यासोबत लोक त्यांच्या समस्या शेअर करत असतात. सोनू देखील कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून चाहत्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. सोनू सूदच्या अशाच मदतीमुळे लोकही या अभिनेत्यावर विश्वास ठेवतात. सोनू कधी शाळकरीमुला-मुलींना शिकवण्यासाठी सायकल देतो, तर कधी गरजूंसाठी औषधांची व्यवस्था करतो. कोरोनाची तिसरी लाट सुरू होताच सोनूने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत मी तुमच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही दिली होती.
First published:

Tags: Entertainment, Sonu sood angel

पुढील बातम्या