मुंबई, १० सप्टेंबर- गणरायाच्या आगमनाची (Ganesh festival) धूम काही वेगळीच असते. ढोल-ताशाचा आवाज कानावर पडताच पाय आपोआप थिरकू लागतात. बाप्पाच्या येण्याच्या आनंदात जो तो तल्लीन होऊन नाचत असतो. असंच काहीसं दिसून आलं ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या (Sundra Manamdhe Bharali) सेटवर. या मराठी मालिकेच्या सेटवर गणरायाचं इतक्या धुमधडाक्यात आगमन झालं कि प्रत्येक कलाकार आनंदाने थिरकत होता.
कलर्स मराठीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हि मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेतील लतिका आणि अभिमन्यूच्या आगळ्यावेगळ्या लव्हस्टोरीने सर्वांचं भुरळ पाडली आहे. हे झालं मालिकेचं. मात्र हे कलाकार ऑफ कॅमेरासुद्धा धम्माल करत असतात. या कलाकरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच या मालिकेच्या सेटवर लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे.
'सुंदरा'च्या सेटवरील अभिमन्यू-लतिकाचा गणपती डान्स होतोय व्हायरल pic.twitter.com/vW6LbWtiCO
— News18Lokmat (@News18lokmat) September 10, 2021
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या सेटवरील काही व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ बाप्पाच्या आगमनाचे आहेत. या कलाकारांनी अतिशय उत्साहात सेटवर बाप्पाची स्थापना केली आहे. या व्हिडीओमध्ये हे कलाकार ढोल-ताशाच्या गजरात थिरकत बाप्पाला सेटवर घेऊन आले आहेत. (हे वाचा: स्वप्नील जोशी ते वीणा जगताप या कलाकारांच्या घरी झालं बाप्पाचं आगमन ) व्हिडीओमध्ये लतिका अभिपासून ते सज्जन अभिची मैत्रिणीपर्यंत सर्चजण धम्माल डान्स करत आहेत. हे कलाकार अगदी साजेसं असं गणपती डान्स करून सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी प्रत्येक कलाकारामध्ये तुफान उत्साह दिसून आला.

)







