अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या करिअर इतकाच तिच्या कुटुंबालाही वेळ देते. अनेकदा ती तिच्या कुटुंबासोबत स्पॉट होते. पाहा अभिनेत्रीचे अनसीन फोटो. पती राज कुंद्रासोबत नेहमीच शिल्पा दिसते. तसेच ती फोटोही पोस्ट करत असते. शिल्पा दोन मुलांसह आई आणि सासू यांच्यासोबत वेळ घालवताना दिसत आहे. शिल्पा तिचं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ अगदी व्यवस्थित सांभाळते. शाळेत असताना शिल्पा स्पोर्ट्समध्ये फार सक्रिय होती. ती व्हॉलिबॉल टीमची कॅप्टन देखील होती. त्यामुळे आपल्या फिटनेस ट्रेनिंगची सुरुवात तेव्हापासूनच झाली असल्याचं तिने म्हटलं होत. मागील वर्षी शिल्पाच्या मुलीचा जन्म झाला. तिला सरोगेसी पद्धतीने जन्म देण्यात आला. पती राज कुंद्राच्या बहिणींसोबतही शिल्पाचं एक मैत्रीचं नात आहे. शिल्पा तिच्या आईसोबत नेहमी फोटो पोस्ट करत असते. शिल्पा नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधान्य देताना दिसते. वसोशल मीडियावरही त्यांचे फोटो पोस्ट करत असते.