जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडला कोरोनाचं ग्रहण; आयुषमान खुरानाच्या ‘ड्रिमगर्ल’ चित्रपटातील अभिनेत्रीचं निधन

बॉलिवूडला कोरोनाचं ग्रहण; आयुषमान खुरानाच्या ‘ड्रिमगर्ल’ चित्रपटातील अभिनेत्रीचं निधन

बॉलिवूडला कोरोनाचं ग्रहण; आयुषमान खुरानाच्या ‘ड्रिमगर्ल’ चित्रपटातील अभिनेत्रीचं निधन

अनेक चित्रपट आणि मालिकांत काम केलेल्या अभिनेत्रीचं कोरोनामुळे निधन

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 4 जून: सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत अनेकजन आपल्या प्रियजनांना गमावत आहेत. तर अनेकांना कोरोनाची लागण देखील झाली आहे. अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. अशातच आणखी एका अभिनेत्रीचं कोरोनाने निधन झालं आहे. रिंकू सिंग निकुंभ (Rinku singh Nikumbh) असं तिचं नाव आहे. तिने ‘ड्रिमगर्ल’सह (Dreamgirl) आणखी काही चित्रपटांत काम केलं होतं. अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmaan Khurana) सोबत काम केलेली रिंकू ही छोट्या पडद्यावरील चिडियां घर या मालिकेतून नावारुपास आली होती. ती एक थिएटर आर्टिस्ट होती. रिंकूची चुलत बहीण चंदा सिंग हीने रिंकूच्या निधनाची बातमी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

जाहिरात

चंदाने सांगितलं की रिंकूचा 25 मे ला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ती घरातच कॉरन्टाइन होऊन औषध घेत होती मात्र तिचा ताप कमी होत नव्हता. त्यामुळे तिला दवाखान्यात भरती करण्यात आलं. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र अचानक ती सगळ्यांना सोडून गेली.

चंदाने पुढे सांगितलं की रिंकू एक अस्थमाची पेशंट होती. तिने 7 मे ला कोव्हॅक्सिन लस देखिल घेतली होती. रिंकूच्या घरातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रिंकूलाही लागण झाली. रिंकू एक आनंदी व्यक्ती होती. असही ती म्हणाली.

अँजेलिना जोली खऱ्या प्रेमाच्या शोधात; 3 लग्न 8 बॉयफ्रेंड, मात्र तरी विश्वसुंदरी पडली एकटी

अनेक चित्रपटात दिसलेल्या रिंकूचा हॅलो चार्ली हा अमॅझॉन प्राइमचा शेवटचा चित्रपट ठरला. चिडियाघर शिवाय ती बालवीर या मालिकेतही दिसली होती. सिनेसृष्टीतील अनेकंनी कोरोनाची लागन झाली आहे. तर काहींच यात निधन सुद्धा झालं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता रोहीत बोहरा याचही कोरोनाने निधन झालं होत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात