जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Nusrat Jahan ने पहिल्यांदाच सांगितलं यशदाससोबतच्या लग्नाचे सत्य, म्हणाली...

Nusrat Jahan ने पहिल्यांदाच सांगितलं यशदाससोबतच्या लग्नाचे सत्य, म्हणाली...

Nusrat Jahan ने पहिल्यांदाच सांगितलं यशदाससोबतच्या लग्नाचे सत्य, म्हणाली...

तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँच्या (Nusrat Jahan) लग्नाची चर्चा रंगलेली आहे. याचा खुलासा नुकताच तिनं केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 फेब्रुवारी- तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) नेहमीच तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत असते. मागील वर्षी नुसरतने एका बाळाल जन्म दिला आहे. तिच्या या मुलाचा बाबा अभिनेता यशदास गुप्ता आहे. याचा खुलासा देखील तिनंच केला होता. यानंतर आता तिच्या लग्नाची चर्चा रंगलेली **(Nusrat Jahan Wedding Reality)**आहे. मागच्या आठवड्यात याविषयावर नुसरत पत्रकारांना म्हणाली होती की, तुम्हाला काय माहित माझे लग्न झाले आहे की नाही? या मुलाखतीवेळी तिनं मला आणि यशला पुन्हा लग्न करण्याती गरज नसल्याचे म्हटले होते. नुसरतने एका मुलाखतीमध्ये यशदास गुप्तासोबतच्या नात्याविषी तसेच त्यांच्या लग्नाच्या चर्चा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. नुसरत इंडिया टुडेशी बोलताना म्हणाली की, मला माहित नाही की लोक लग्नावरून इतके चिंतेत का आहेत. ते मला प्रश्न विचार आहेत. म्हणजे नेमकी तुम्हची याबद्दल अपेक्षी तरी काय आहे. मी काय आता सगळ्यांना फोन करून सांगू काय, मी आता लग्न करत आहे. जर असं असेल तर तुम्ही माझ्याकडून चुकीची अपेक्षा ठेवत आहात. वाचा- अमिताभ दयालच्या मृत्यूदिवशीच आली आणखी एका हार्ट सर्जरीची बातमी नुसरत पुढे म्हणाली की, जर माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही बोलायचे नसेल तर ती माझी निवड आहे. जेव्हा तिला तिचे आणि लग्न झाले आहे का असे विचारले असता नुसरतने उत्तर दिले की, आम्हाला पुन्हा लग्न करण्याची गरज नाही. हे वाटेल? नुसरताच मुलगा यिशानच्या जन्म दाखल्यावर यशचे नाव नुसरतने 2019 मध्ये तुर्कीमध्ये उद्योगपती निखिल जैनशी लग्न केले. जून 2021 मध्ये, तिने सांगितले की भारतीय कायद्यानुसार त्यांचे लग्न योग्य नाही. यानंतर नुसरतने गेल्या वर्षी 26 ऑगस्टला मुलगा यिशानला जन्म दिला. यशचे नाव त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर त्याच्या वडिलांच्या नावाने लिहिले होते. नुसरतला कोलकाता येथील ‘भागीरथी निओटिया हॉस्पिटल’मधून डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा यशने यिशानला घेतले होते. वाचा- सलमानमुळे लग्नानंतरचा पहिला V-Day कॅट -विकीसोबत करणार नाही साजरा यशदास गुप्ताने दिली होती नुसरतच्या तब्येतीची माहिती यशने नुसरतच्या तब्येतीबाबात एक अपडेटही चाहत्यांशी शेअर केली होती. त्याने लिहिले होते की, “जे नुसरतच्या तब्येतीची चौकशी करत आहेत, आई आणि मूल निरोगी आहेत आणि दोघेही चांगेल आहेत. नुसरत आणि यश 2020 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात