जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / समन्स पाठवूनही रणवीर सिंह उद्या पोलीस ठाण्यात राहणार नाही हजर; न्यूड फोटोशूट प्रकरणी अपडेट

समन्स पाठवूनही रणवीर सिंह उद्या पोलीस ठाण्यात राहणार नाही हजर; न्यूड फोटोशूट प्रकरणी अपडेट

समन्स पाठवूनही रणवीर सिंह उद्या पोलीस ठाण्यात राहणार नाही हजर; न्यूड फोटोशूट प्रकरणी अपडेट

मुंबई पोलिसांनी रणवीरला समन्स पाठवून 22 ऑगस्ट, सोमवारी हजर होण्यासाठी सांगितलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून आपल्या चित्रपटांमुळे नाही तर न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आहे. या फोटोशूटनंतर रणवीरविरोधात मुंबई पोलिता तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी रणवीरला समन्स पाठवून 22 ऑगस्ट, सोमवारी हजर होण्यासाठी सांगितलं होतं. पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी रणवीरने 2 आठवड्यांची मुदत मागितली आहे. रणवीर पाठवण्यात येईल समन्स… न्यूड फोटोशूटनंतर रणवीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर मुंबई पोलिसात रणवीरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याने पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आलं होतं. आता रणवीरने या प्रकरणात पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत मागितली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सांगितलं की, रणवीरला हजर राहण्यासाठी नवी तारीख ठरवल्यानंतर लवकरच नवं समन्स पाठवण्यात येईल. रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट वादात! भारतात अश्लीलतेचं प्रमाण आणि कायदा काय सांगतो? घरात नव्हता रणवीर… रणवीरने एका इंटरनॅशनल मॅगजीनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. ज्याचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंवर अनेकांनी आणि सामाजिक संघटनांनी आक्षेप दाखल केला होता. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. नोटीस देण्यासाठी जेव्हा पोलीस अधिकारी रणवीरच्या घरी गेले, त्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. Ranveer Singh: रणवीर सिंह अडचणीत; न्यूड फोटोशूट प्रकरणात महिलेची पोलिसात तक्रार यापूर्वीही अशी प्रकरणे समोर भारतात अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, जेव्हा बॉलीवूड कलाकारांसह अन्य लोकांवर अश्लील वर्तन, अश्लील साहित्य आणि अश्लील भाषेसाठी कायद्याच्या कक्षेत आणून खटला भरण्यात आला आहे. याआधीही 2020 मध्ये अशा प्रकरणी अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि पूनम पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे असे कायदे आणखी कडक झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात