मुंबई, 01 एप्रिल : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजे एनएमएसीसीचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांच्या स्वप्नातील आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे सांस्कृतिक केंद्र प्रत्यक्षात साकारलं आहे. आईचं हे स्वप्न साकार होताच, ईशा अंबानी एनएमएसीसीच्या स्टेजवर व्यक्त झाल्या आहेत.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालिका ईशा अंबानी यांनी NMACC मध्ये सर्वांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी आई नीता अंबानी यांच्या दूरदृष्टीबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, 'हे केंद्र जिवंत करणं हे पूर्णपणे प्रेम आणि आनंदाचं असं काम होतं. या केंद्राचं नाव माझ्या आईच्या नावावर ठेवण्यात आलं आहे - NMACC, जे तिच्या कलेसाठी असलेल्या समर्पणाचा सन्मान आहे"
"एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना म्हणून हा स्टेज नेहमीच माझ्या आईचं मंदिर राहिलं आहे. तिचं कलेवरील प्रेम हे माध्यम किंवा स्वरूपाच्या पलिकडे आहे. पारंपारिक भारतीय कला आणि हस्तकलेचे पुनरुज्जीवन, जतन आणि संवर्धन करण्यासाठी तिने स्वत:ला झोकून देताना मी गेली कित्येक वर्षे पाहिलं आहे.
Nita Ambani Dance Video : NMACC मध्ये नीता अंबानींचा जबरदस्त परफॉर्मन्स; डान्स पाहून हटणार नाही नजर
NMACC हे देशातील पहिले सांस्कृतिक केंद्र आहे, जे आंतरराष्ट्रीय सुविधांनी सुसज्ज आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये हे केंद्र आहे. जगभरातील कलात्मक प्रदर्शने येथे भरवली जातील. स्टुडिओ थिएटर, पब्लिक आर्ट आणि आर्ट हाऊससह अनेक गोष्टी या केंद्रात आहेत.
अशा प्रकारचे पहिले सांस्कृतिक केंद्र कलाकार आणि प्रेक्षकांच्या गरजा एकाच वेळी कशा पूर्ण करेल? याबाबत ईशा अंबानी म्हणाल्या, "NMACC म्हणजे फक्त आयुष्यभराच्या स्वप्नाची पूर्तता नाही, तर ती एका प्रवासाची सुरुवातही आहे. हा प्रवास सर्जनशील अनुभव आणि अभिव्यक्तींमध्ये नवीन जीवन भरण्याच्या दिशेने आहे. प्रतिभेला प्रोत्साहन आणि जोपासण्याच्या दिशेने प्रवासाची ही सुरुवात आहे"
NMACC च्या उद्घाटनाला देशविदेशातील सेलिब्रिटी
31 मार्चला या केंद्राचं उद्घाटन झालं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी आणि त्यांची मुलगी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) च्या संचालक ईशा अंबानी या समारंभाला उपस्थित होत्या. याशिवाय अनंत अंबानी आणि त्यांची होणारी बायको राधिका मर्चंट यांनीही उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी देखील सहभागी झाले होते.
नीता अंबानीचं कल्चरल सेंटर पाहूनच दिपतील डोळे; NMACCचे Inside Photo
देशविदेशातील सेलिब्रिटीही या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात आले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह या कार्यक्रमाला पोहोचले होते. त्यांच्या व्यतिरिक्त सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, युवराज सिंग, सोनम कपूर, नीतू कपूर, गौरी खान, उद्योगपती आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर पत्नी आणि मुलीसह आले. हॉलिवूड स्टार टॉम हॉलंडही या कार्यक्रमात पोहोचल्याची माहिती आहे. या सोहळ्याला सुपरस्टार रजनीकांतही उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Nita Ambani, Reliance