मुंबई, 01 एप्रिल : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर म्हणजे एनएमएसीसीचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांच्या स्वप्नातील आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे सांस्कृतिक केंद्र प्रत्यक्षात साकारलं आहे. नीता अंबानी यांनीही उद्घाटनादिवशी आपल्या नृत्याची झलक इथं दाखवली. त्यांनी रघुपती राघव या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.
NMACC हे देशातील पहिले सांस्कृतिक केंद्र आहे, जे आंतरराष्ट्रीय सुविधांनी सुसज्ज आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये हे केंद्र आहे. जगभरातील कलात्मक प्रदर्शने येथे भरवली जातील. स्टुडिओ थिएटर, पब्लिक आर्ट आणि आर्ट हाऊससह अनेक गोष्टी या केंद्रात आहेत.
31 मार्चला या केंद्राचं उद्घाटन झालं. या केंद्राच्या उद्घाटनात नीता अंबानी म्हणाल्या की, "कल्चरल सेंटरला मिळत असलेला पाठिंबा पाहून मी भारावून गेले आहे. हे जगातील सर्वोत्तम सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. सर्व कला आणि कलाकारांचे येथे स्वागत आहे. येथे लहान शहरे आणि दूरवरच्या भागातील तरुणांनाही त्यांची कला दाखवण्याची संधी मिळेल."
NMACC चं उद्घाटन; 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'मध्ये या लोकांना Free entry
तर मुंबईसह देशासाठी एक प्रमुख कलेचे केंद्र म्हणून हे केंद्र उदयास येईल, अशी विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी आणि त्यांची मुलगी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) च्या संचालक ईशा अंबानी या समारंभाला उपस्थित होत्या. याशिवाय अनंत अंबानी आणि त्यांची होणारी बायको राधिका मर्चंट यांनीही उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी देखील सहभागी झाले होते.
नीता अंबानीचं कल्चरल सेंटर पाहूनच दिपतील डोळे; NMACCचे Inside Photo
याशिवाय देशविदेशातील सेलिब्रिटीही या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात आले होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह या कार्यक्रमाला पोहोचले होते. त्यांच्या व्यतिरिक्त सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, युवराज सिंग, सोनम कपूर, नीतू कपूर, गौरी खान, उद्योगपती आनंद महिंद्रा, सचिन तेंडुलकर पत्नी आणि मुलीसह आले. हॉलिवूड स्टार टॉम हॉलंडही या कार्यक्रमात पोहोचल्याची माहिती आहे. या सोहळ्याला सुपरस्टार रजनीकांतही उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Nita Ambani, Reliance