'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'चं 31 मार्च रोजी उद्घाटन होत आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये हे सेंटर आहे. उद्घाटनानिमित्त सेंटरमध्ये 3 दिवस ब्लॉकबस्टर शो असेल. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील कलाकारांसह बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कलाकार उपस्थित राहणार आहेत. सेंटरमार्फत देशातील सर्व नागरिकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यासाठी खास तिकीटं देखील आयोजित करण्यात आली आहे. केंद्रात जाण्यासाठी, इथले कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही nmacc.com किंवा BookMyShow वरून तिकिटे खरेदी करू शकतात. केंद्रात मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवेश दिला जाईल. भारतीय संस्कृती आणि कलेसाठी नवी दालनं खुली होतील असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला आहे.