Home /News /entertainment /

Nipun Dharmadhikari: चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक निपुणला देतेय एक गोंडस व्यक्ती त्रास, कोण आहे पाहा

Nipun Dharmadhikari: चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक निपुणला देतेय एक गोंडस व्यक्ती त्रास, कोण आहे पाहा

'बापजन्म' या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक सध्या त्याच्या पहिल्या बॉलिवूड फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सेटवर त्याला एक गोड व्यक्ती त्रास द्यायला आली आहे. कोण आहे ही व्यक्ती?

  मुंबई 28 जून: दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) सध्या उत्तराखंडमध्ये असून त्याच्या बॉलिवूडमधील डिरेक्शन डेब्यूसाठी (Nipun Dharmadhikari bollywood debut) तो सज्ज होत आहे. 2003 मध्ये आलेला इश्क विश्क नावाचा चित्रपट तर सगळ्यांना माहित असेलच. त्याच चित्रपटाचा recreated version येत्या काळात समोर येणार आहे ज्याचं दिग्दर्शन निपुण करताना दिसणार आहे. ‘इश्क विश्क rebound’  (Ishq Vishk rebound) असं या फिल्मचं नाव आहे. निपुण सध्या सेटवरची लाईफ एन्जॉय करताना दिसत आहे. पण असंही कोणीतरी आहे जे त्याला सेटवर त्रास देत आहे. निपुण अगदी एखाद दोन वर्षांपूर्वीच बाबा झाला आहे. निपुण आणि त्याची पत्नी संहिता यांना विहा नावाची मुलगी (Nipun Dharmadhikari daughter name) आहे. 2021 मध्ये त्यांच्या मॅरेज ऍनिव्हर्सरीला निपुणने खास पोस्ट टाकून आपण बाबा झाल्याची बातमी दिली होती. निपुण सध्या शूटिंग करत असल्याने घरापासून लांब आहे. मागे त्याला मुलीची आठवण येत असल्याचं सुद्धा त्याने सोशल मीडियावर स्टोरी आणि पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं. पण फिकर नॉट; निपुणची मुलगीच त्याला सरप्राईज द्यायला सेटवर जाऊन पोहोचली आहे. निपुणने नुकतीच एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत असं म्हणलं, “ही एकंच लक्ष विचलित करणारी गोष्ट मला सेटवर आलेली आवडते.. थोड्या काळासाठी’. निपुणची मुलगी विहा आणि त्याची बायको संहिता असे दोघेही या फोटोमध्ये दिसत असून अगदी मोकळेपणाने हसताना त्याची ही गोंडस मुलगी दिसत आहे. मागे रोहित सराफ या हिंदी अभिनेत्याने सुद्धा निपुण आणि विहाचा एक विडिओ शेअर केला होता ज्यात विहा अगदी गोड आणि निरागसपणे ‘पॅकअप’ म्हणत होती. एखाद्या दिवसाचं एवढं गोड पॅकअप कधीच झालं नव्हतं असं टीममधल्या अनेकांनी म्हणलं होतं.
  निपुणने याआधी सुद्धा विहाचे अनेक अपडेट्स आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले आहेत. ‘मला माझं काम खूप आवडतं पण ती मोठी होत असताना तिला बघायला मिळत नाही हे मला आवडत नाही’ असं सुद्धा तो एका पोस्टमध्ये म्हणाला आहे. हे ही वाचा- श्वेताच्या साडीचं 'लागीर झालं जी'च्या जीजींशी आहे खास कनेक्शन, शेअर केली भावूक पोस्ट निपुण दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमामध्ये रोहित सराफ, पश्मिना रोशन, जिब्रान खान, नाईला ग्रेवाल अशी यंग आणि तडफदार कास्ट आहे. 2003 मध्ये आलेल्या इश्क विश्क सिनेमाचं एक आगळंवेगळं व्हर्जन नेमकं कसं असणार आहे? जुन्या सिनेमाप्रमाणे ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना आवडणार का असे उत्सुकता वाढवणारे प्रश्न सध्या विचारले जात आहेत.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Bollywood, Director, Marathi cinema

  पुढील बातम्या