नुपूर पाटील, प्रतिनिधी मुंबई, 1 एप्रिल : महाराष्ट्राला फेट्याची परंपरा अनेक वर्ष पूर्वीपासून लाभलेली आहे. प्रत्येक समाजाच्या प्रथा परंपरेनुसार फेटा वेगवेगळ्या पद्धतीने बांधण्यात येतो. फेट्याचा शेला काढण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या आहेत. अनेक संप्रदायाप्रमाणे वेगवेगळे फेटे बांधले जातात. मुंबई तील गिरगाव येथे राहणारा निहार तांबडे हा फेटे बांधणारा कलाकार आहे. नुसताच कलाकार नाही तर फेटे कसे बांधावे याची उत्तमरीतीने माहिती असणारा कलाकार आहे. निहार कसं शिकला फेटे बांधायला? निहार तांबडे अगदी सामान्य कुटुंबातला तरुण आहे. आपल्या मित्रासोबत निहार फेटे बांधण्याकरता लग्न समारंभ व इतर कार्यक्रमामध्ये जायचा. मित्र कसा फेटे बांधतो याचे तो निरीक्षण करायचा आणि याचं निरीक्षणातून तो फेटे बांधण्यास शिकला. रुपक मोरे हा निहारचा मित्र आहे. त्याने सुद्धा त्याला फेटे कसे बाधायचे हे शिकवले. त्याच्यामुळे मी इतक्या छान पद्धतीने फेटे बांधण्यास शिकलो. रुपक हा माझा फक्त मित्रच नसून तो गुरु आहे, असं निहार सांगतो.
एका मेसेजनं कलाटणी जय जय महाराष्ट्र हा रियलिटी शो सुरु असताना अभिनेता सुबोध भावे यांनी बांधलेला फेटा निहारला पटला नाही. त्यामुळे निहारने भावे यांना मॅसेज केला. त्यावेळी सुबोध भावे यांनी निहार याला म्हटलं की तुम्ही सेट वर येऊन आम्हाला फेटे बांधा. ठरलेल्या वेळेप्रमाणे निहार तेथे पोहोचला आणि त्यांना फेटे बांधले व ते बांधलेले फेटे सर्वाना खुप आवडले अन पुढे फेटे म्हटलं की सर्वाना निहारच आठवू लागला. अनेक मराठी चित्रपट, मालिका यांमध्ये निहार फेटे बांधतो. फेटा बांधताना प्रत्येक बाब लक्षात घेऊन निहार फेटे बांधतो. शरीरयष्टीला शोभेल अश्या पद्धतीने डोक्यावर अगदी चापूनचोपून बसवतो. त्यात डोकं दुखणार नाही याची काळजी घेतो. तसेच निहारकडे विशेष कला आहे ती म्हणजे नऊवारी आणि सहावारी साडीचा फेटा हा ज्याच्या त्याच्या फेसिंग नुसार बांधतो आणि अगदी उत्कृष्ट पद्धतीने तुरा जास्त मोठा नाही आणि जास्त लहान नाही होणार हे लक्षात ठेवून फेटा बांधतो.
Mumbai Wholesale Market : क्रॉफर्ड मार्केटमध्ये ‘या’ ठिकाणी खरेदी करा सर्वात स्वस्त दागिने, Video
मान म्हणून डोक्यावर बांधला जातो कार्यक्रमातील विशेष व्यक्तींना बांधायला साडीचा फेटा योग्य असतो. कारण फेटा विकत घेतला की तो नंतर तसाच पडून राहतो साडीचा फेटा बांधला तर साडी नंतर वापरता येते आणि त्याचा योग्य सन्मान होतो. फेटा हे मान म्हणून डोक्यावर बांधला जातो आणि त्याचाच अपमान झालेला मला सहन होत नाही, असं निहार म्हणतो. काय आहेत फेटे बांधण्याचे रेट्स? नवरदेवाचा किंवा अजून घरातील खास व्यक्तींचा फेटा बांधण्याचे 3100 रुपये मानधन आहे. त्यात साडी आज ट्रॅव्हलिंग खर्च वेगळा. तर इतर साईडर्सला फेटा बांधण्याचे रेट्स 350 रुपयांपासून पुढे आहेत . निहार तांबडे +918087545175