मुंबई, 16 जून : अमेरिकन गायक निक जोनस आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanaka Chopra Latest News ) काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. प्रियांका चोप्रानं मदर्स डेच्या निमित्त आपल्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. प्रियांका आणि निक आपल्या मुलीच्या प्रायव्हसीबाबत खूपच जागरुक आहेत. निक जोनसनं मुलगी मालती (Malti) हिला रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी का शेअर केली होती, याविषयी नुकताच (priyanka chopra daughter) त्याने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
निकने नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या मुलगीला रुग्णालयात दाखल करण्याविषयी सांगितले आहे. निक जोनसने हे उघड केले आहे की, बाळाच्या हॉस्पिटलायझेशन आणि पालकत्वाच्या प्रवासाबद्दल बोलणे त्याच्यासाठी आणि प्रियांकासाठी का महत्त्वाचे होते. याविषयी बोलताना निक म्हणाला की, मला वाटते की आम्ही सोशल मीडियावर जे शेअर केले ती आमची एक भावना होती. बाळाला घरी आणता आल्याबद्दल कृतज्ञ आणि हॉस्पिटलमधील या नाजूक प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार. मला फक्त लोकांना एवढंच सांगायचंय की, डायबिटीज असू द्या किंवा दुसरी कोणती लढाई यातून तुमच्यासारखे अनेक लोकं जात असतात.
View this post on Instagram
हे ही वाचा - रणबीरच्या 'त्या' एका निर्णयामुळं Brahmastra चित्रपट बनवायला लागली 9 वर्षे, आयान मुखर्जीनं केला खुलासा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Hollywood, Nick jonas, Priyanka chopra