• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Pornography Case: 'दीदी चूक मान्य केलात तर...', VIDEO शेअर करत शर्लिन चोप्राचा शिल्पा शेट्टीवर पुन्हा हल्लाबोल

Pornography Case: 'दीदी चूक मान्य केलात तर...', VIDEO शेअर करत शर्लिन चोप्राचा शिल्पा शेट्टीवर पुन्हा हल्लाबोल

पॉर्नोग्रॅफी केसमध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीला लक्ष्य केलं आहे. सुरुवातीपासूनच शर्लिनने या प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांवर हल्लाबोल केला होता. आज पुन्हा एकदा तिने व्हिडीओ शेअर करत शिल्पाला लक्ष्य केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra Arrest) पॉर्नोग्रॅफी केसमध्ये (Pornography Case) अद्यापही जेलमध्ये आहे. राज कुंद्रावर अश्लिल चित्रफिती (Porn Video) बनवण्याचा आणि त्या शेअर करण्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्याला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. या घटनेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी विशेष चर्चेत आली होती. तिचं करिअर संपुष्टात येतंय की काय अशी चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. या दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) पुन्हा एकदा शिल्पा शेट्टीला लक्ष्य केलं आहे. सुरुवातीपासूनच शर्लिनने या प्रकरणात या पतीपत्नीवर हल्लाबोल केला होता. आज पुन्हा एकदा तिने व्हिडीओ शेअर करत शिल्पाला लक्ष्य केलं आहे. शर्लिन चोप्राने एक व्हिडीओ शेअर करत शिल्पा शेट्टीवर टीका केला आहे. तिने शिल्पाने माफी मागावी अशी मागणी केली आहे. 2 मिनिटांपेक्षा अधिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर शिल्पाच्या आणि शर्लिनच्या दोघींच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहे. शर्लिनने हा व्हिडीओ शेअर करताना असं कॅप्शन दिलं आहे की, 'हाय शिल्पा दीदी, मी तुम्हाला विनंती करते की पीडित मुलींबद्दल थोडी सहानुभूती दाखवा आणि तुमच्या चुका स्वीकारा. चूक मान्य केल्यास कोणीही लहान होत नाही.' हे वाचा-Nusrat Jahan यांनी बाळाचं नाव ठेवलं ईशान, सिंगल मदर बनून करणार मुलाचा सांभाळ? VIDEO मध्ये काय म्हणाली शर्लिन? शर्लिन या व्हिडीओमध्ये असं म्हणाली आहे की, 'हाय दीदी, अलीकडेच तुम्ही एका रिअॅलिटी शोच्या मंचावर असं म्हटलं आहे की, तुम्ही जेव्हा राणी लक्ष्मीबाईंची कहाणी ऐकता तेव्हा तुम्हाला गर्व वाटतो. तुम्ही हे देखील हे म्हटलं की राणी लक्ष्मीबाईंची कहाणी रिअॅलिटी आहे, इतिहास आहे.. राणी लक्ष्मीबाईं सारख्या विरांगना ज्यांनी त्यांच्या दृढता, वीरता आणि धैर्याने इतिहास रचला त्यांना भारतातील प्रत्येकजण ओळखतो. हा ही गोष्ट वेगळी आहे की काही ब्रिटिश पासपोर्ट होल्डर्स त्यांच्याबद्दल जाणत नाहीत. तुम्ही हे देखील म्हटलं की ज्या महिला संकटाचं धैर्याने तोंड देतात त्यांना तुम्ही साष्टांग दंडवत करता. या महिलांमध्ये त्या अबला पीडित महिला देखील आहेत का ज्यांनी हिंमत करून विविध पोलीस स्टेशनमध्ये जबाब नोंदवला?' हे वाचा-Ananya Panday चे सुपरहॉट लुक्स, Viral होतायंत ग्लॅमरस अंदाजातील Photos शर्लिन पुढे असं म्हणाली आहे की, 'आजकाल जेव्हा केव्हा मी सोशल मीडियावर फोटो अपलोड करते, तेव्हा तुमचे समर्थक एकवटून ते फोटो फोटोशॉप्ड असल्याचं म्हणतात. मी तुम्हाला सांगू इच्छिते की या देशातील तपास यंत्रणा तुमच्यापेक्षा, माझ्यापेक्षा आणि तुमच्या समर्थकांपेक्षा जास्त सुशिक्षित आणि समजुतदार आहे.'
  दरम्यान गेल्या महिनाभरापासून या पॉर्नोग्रॅफी केसमध्ये राज कुंद्रा जेलमध्ये आहे. राज कुंद्राला 19 जुलै रोजी मुंबईच्या क्राइम ब्रँचने अटक केली होती. ज्यानंतर गुन्हेशाखेने राज कुंद्रा आणि संबंधिक पॉर्नोग्रॅफीच्या मोठ्या रॅकेटचा खुलासा केला होता. यानंतर अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी समोर येत राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले होते. शर्लिनने देखील राज कुंद्रावर आरोप केले होते. अभिनेत्रीने असा आरोप केला होता की, राज कुंद्राने जबरदस्तीने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: