मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आई बनल्यानंतर Priyanka Chopra ने पहिल्यांदाच शेअर केला खास फोटो

आई बनल्यानंतर Priyanka Chopra ने पहिल्यांदाच शेअर केला खास फोटो

Priyanka Chopra

Priyanka Chopra

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priy anka Chopra)आणि तिचा पॉप स्टार पती निक जोनास (Nick Jonas) अलीकडेच सरोगसीद्वारे आई-बाबा झालेत. दोघांनी या जगात छोट्या परीचं स्वागत केलं आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 3 फेब्रुवारी: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पॉप स्टार पती निक जोनास (Nick Jonas) अलीकडेच सरोगसीद्वारे आई-बाबा झालेत. दोघांनी या जगात छोट्या परीचं स्वागत केलं आहे. पहिल्या बाळाच्या आगमनानंतर, आता प्रियांकाला तिचा सर्व वेळ तिच्या बाळाला द्यायचा आहे. त्यामुळे तिने एका चित्रपाटाची ऑफरदेखील नाकारली. दरम्यान, तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आई बनल्यानंतर प्रियांकाने पहिल्यांदाच स्वतःचे खास फोटो शेअर केले आहेत.

नुकतंच प्रियांकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन सेल्फी शेअर केले आहेत. ते सेल्फी तिनं तिच्या गाडीत बसून काढलेले दिसत आहेत. त्या फोटोना तिनं कॅप्शन दिलं आहे की,'The light feels right. ✨ आई होण्याच्या अनाऊन्समेंटनंतर प्रियंकानं ही तब्बल 11 दिवसांनी केलेली पहिली पोस्ट आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

तिने शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. काही युजर्सनी 'हॅलो मम्मी'....तर काहींनी 'वेलकम बॅक मम्मी' असे कमेंट्स मध्ये म्हटले आहे.

प्रियांका नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपल्या खासगी गोष्टी शेअर करत चाहत्यांच्या प्रयत्नात राहत असते. दरम्यान, आई झाल्यानंतर तिने स्वतःला सोशल मीडियापासून दुर ठेवले असल्याचे चित्र समोर आले. इतकेच नव्हे तर तिने 100 कोटी खर्चून बनत असलेल्या 'जी ले जरा' (Jee Le Zaraa) या चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Mother, Nick jonas, Parents, Priyanka chopra, Social media viral