मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘…अन्यथा तुम्ही बाहेर फेकले जाल’; कियारानं दाखवली बॉलिवूडची जीवघेणी स्पर्धा

‘…अन्यथा तुम्ही बाहेर फेकले जाल’; कियारानं दाखवली बॉलिवूडची जीवघेणी स्पर्धा

बॉलिवूडमध्ये अगदी जीवघेणी स्पर्धा (Cut Throat Competition) असल्याने इथे काम करणं हे सोपं नाही. मात्र काम करण्यात मजा येते हे नक्की, असं कियाराने सांगितलं.

बॉलिवूडमध्ये अगदी जीवघेणी स्पर्धा (Cut Throat Competition) असल्याने इथे काम करणं हे सोपं नाही. मात्र काम करण्यात मजा येते हे नक्की, असं कियाराने सांगितलं.

बॉलिवूडमध्ये अगदी जीवघेणी स्पर्धा (Cut Throat Competition) असल्याने इथे काम करणं हे सोपं नाही. मात्र काम करण्यात मजा येते हे नक्की, असं कियाराने सांगितलं.

  मुंबई 19 मार्च: “बॉलिवूडमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. या ठिकाणी टिकून राहणं सोप काम नाही. तुम्हाला सतत सर्जनशील राहावं लागतं. अन्यथा तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ शकता”, अभिनेत्री कियारा अडवाणीनं (Kiara advani) अशा शब्दात बॉलिवूडचं वास्तव प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला. कियारानं अलिकडेच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं बॉलिवूडमधील या आश्चर्यचकित करणाऱ्या स्पर्धेचा उल्लेख केला.

  बॉलिवूडमध्ये अगदी जीवघेणी स्पर्धा (Cut Throat Competition) असल्याने इथे काम करणं हे सोपं नाही. मात्र काम करण्यात मजा येते हे नक्की, असं कियाराने सांगितलं. "जिथे प्रत्येक जण काही तरी नवं आणि औत्सुक्यपूर्ण सादर करत असतो, अशा कलाकारांमध्ये समाविष्ट असणं हे खरं तर चांगलं आहे. ही गोष्ट तुम्हालाही कामाची प्रेरणा देते. अगदी सेकंदभरासाठीही तुम्ही हे हलकं म्हणून घेऊ शकत नाही. गेल्या वर्षभरात ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जो काही कंटेंट आपण पाहिला आहे, त्यावरून मला असं वाटतं, की प्रत्येक जणच आउट ऑफ बॉक्स कल्पना घेऊन येतो आहे," असं कियारा म्हणाली.

  अवश्य पाहा - ‘हे बुटी शेक काय आहे?’ आशा भोसलेंच्या आवाजात जॅमीनं उडवली टोनीची खिल्ली

  कियाराची बॉलिवूडमधली आतापर्यंतची वाटचाल कौतुकास्पद आहे. 2014मध्ये फग्ली (Fugly) या सिनेमातून तिने चित्रसृष्टीत पदार्पण केलं. तिथपासून 2018मधल्या 'लस्ट स्टोरीज'पर्यंतचा (Lust Stories) तिचा प्रवास दखल घेण्यासारखा आहे. लस्ट स्टोरीज या नेटफ्लिक्स सीरिजमध्ये करण जोहर दिग्दर्शित भागात कियाराने भूमिका केली होती. 2019मधल्या 'गुड न्यूज'मध्ये ती करीना कपूर, अक्षय कुमार आणि दिलजित दोसांजबरोबर दिसली. तसंच 2020मधल्या 'लक्ष्मी'मध्येही तिने अक्षयकुमारबरोबर काम केलं. नेटफ्लिक्सच्या 2020मध्ये आलेल्या 'गिल्टी'मध्येही ती होती.

  अवश्य पाहा - बॉलिवूडच्या किसिंग क्वीनला करायचंय पुनरागमन; 18 किलो वजन केलं कमी

  या वर्षी दोन जुलै रोजी प्रदर्शित होणार असलेल्या शेरशाह (Shershah) या सिनेमात कियारा सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. हा सिनेमा परमवीरचक्र मिळालेले लष्करातले कॅप्टन विक्रम बात्रा (Captain Vikram Batra) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अलीकडेच कियाराने या सिनेमाची पोस्टर्स तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केली. राज मेहता दिग्दर्शित करत असलेला 'जुग जुग जियो' हा सिनेमाही तिच्या हातात असून, त्यात वरुण धवन, अनिल कपूर, नीतू कपूर, प्राजक्ता कोळी यांच्याही भूमिका आहेत. सध्या कार्तिक आर्यन आणि तबू यांच्यासोबत कियारा अनीस बाझमींच्या 'भुलभुलैया टू'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

  First published:

  Tags: Entertainment, Kiara advani