मुंबई 22 मे : प्रसिद्ध निर्माती एकता कपूरचं (Ekta Kapoor) प्रॉडक्शन हाऊस असलेलं ‘Alt बालाजी’ (ALT Balaji) विविध कारणांसाठी सतत चर्चेत असंत. तर अनेकदा त्यांना प्रेक्षकांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. असच काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे. एका पोस्टमुळे पुन्हा एकदा Alt बालाजी ट्रेंड करत आहे. ‘बिग बॉस’ या बहुचर्चित शो मधून नावारुपास आलेली अभिनेत्री शेहनाझ गील (Shehnaz Gill) मुळे ही नामुष्की Alt बालाजीवर ओढवली आहे. अभिनेत्री विरोधात तसेच तिचा अवमान करणारी एक पोस्ट Alt बालाजीच्या सोशल मीडिया हॅन्डलने लाईक केली होती. आणि त्यानंतर शेहनाझच्या चाहत्यांनी Alt बालाजीला ट्रोल करायला सुरुवात केली. तर #ShameOnAltBalaji हा हॅशटॅगही ट्विटर वर ट्रेंड करू लागला.
या नंतर अनेकांनी ट्विट करत आपला रोष व्यक्त केला. कोणी Alt बालाजी ला वाईट म्हटंल तर कोणी बॅन करण्याची मागणी केली.
#ShameOnAltBalaJi@altbalaji are you guys promoting your webseries Gandi BAAT here ?
— 𝗔𝗦𝗜𝗠'𝗦 𝗪𝗔𝗥𝗥𝗜𝗢𝗥𝗦 (@TEAMASIMFC) May 21, 2021
Not surprised though that's your standard.
This is so low. #ShehnaazGiII #AsimSquad https://t.co/6F0HkREEvP
दरम्यान शेहनाझ ही बिगबॉस मध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) याच्यासोबतच्या बॉडिंगमुळे जास्त चर्चेत आली होती. त्या दोघांच्याही नात्याच्या अनेक बातम्या येत होत्या. पण बिगबॉस नंतर आपण केवळ चांगले मित्र असल्याचं त्यांना स्पष्ट केलं होतं. अजुनही ते चांगले मित्र आहेत.
तर सिद्धार्थने Alt बालाजीसोबत एक वेबसीरिज केली आहे. व लवकरच महिना अखेरीस ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या वेबमालिकेच्या पूर्वी Alt बालाजीवर लागलेल्या या आरोपांचा सीरिजच्या प्रदर्शनावर काही परिणाम तर होणार नाही ना ही शक्यता देखिल वर्तवली जात आहे.
#ShehnaazGill #BrokenButBeautiful3 @altbalaji @ishehnaaz_gill pic.twitter.com/4kYMEnnAj3
— Autumn Worldwide (@Autumnworldwide) May 22, 2021
शेहनाझ आणि सिद्धार्थने बिगबॉस नंतर दोन म्युझिक अल्बम एकत्र केलं होते. तर त्यानंतर ते सतत चर्चेत राहत आहेत. या प्रकरणानंतर Alt बालाजीने त्यावर माफी जाहीर केली आहे. एक पत्रक लिहून त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. यापूर्वीही Alt बालाजीवर काही कारणांनी आरोप करण्यात आले होते.