जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Neha Shitole: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीला मैत्रिणीच्या रूपात भेटली रखुमाई, नेहाची स्पेशल moment बघा!

Neha Shitole: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीला मैत्रिणीच्या रूपात भेटली रखुमाई, नेहाची स्पेशल moment बघा!

Neha Shitole: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीला मैत्रिणीच्या रूपात भेटली रखुमाई, नेहाची स्पेशल moment बघा!

नेहा शितोळेच्या (Neha Shitole fans) एका चाहतीने नेहाला थक्क करणारं एक गिफ्ट दिलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 10 जुलै: बिग बॉस मराठीतून घराघरात धाकड गर्ल अशी ओळख बनवलेल्या नेहा शितोळेच्या (Neha Shitole) आयुष्यात आज एक आनंदाचा दिवस आहे. कलाकारांचे फॅन्स त्यांच्यासाठी मेहनत घेऊन अनेक गोष्टी करताना दिसतात. नेहाच्या एका चाहतीने प्रचंड मेहनत घेऊन एक कलाकृती तिच्यासाठी बनवली आहे. नेहा या सुंदर fan moment ने खूप आनंदात असल्याचं कळत आहे. नेहा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह (Neha Shitole instagram) असते. नेहाने ही खास पोस्ट शेअर करत या चाहतीचे आभार मानले आहेत. नेहाचं एक सुंदर पोर्ट्रेट चित्र काढून या चाहतीने आणलं आहे. नेहा या चित्रात फार अप्रतिम दिसत आहे असं तिच्या अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. या पोस्टला कॅप्शन देत नेहा लिहिते, “ She finally met me… गेलं दीड वर्ष आमची चुकामूक होत होती… आज शेवटी भेटायचा योग आला… आज आषाढी एकादशीच्या दिवशी माझ्या ह्या नव्या मैत्रिणीच्या रूपाने रखुमाई च भेटली जणू… माझी माझ्या स्वतः शी पुन्हा ओळख करून देण्यासाठी… एका नवीन रुपात लवकरच तुमच्या समोर येणार आहे… तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या… हे चित्र काढलं आहे @akshay_sawant._fineartist यांनी… 🙏🏽” नेहा अनेक दिवस या चहातील भेटायचा प्रयत्न करत होती. मात्र दोघींची वेळ जमत नव्हती असं व्हिडिओमध्ये सांगते. पण आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने तिला हे खास गिफ्ट मिळालं आहे. हे ही वाचा-  Marathi actors: आषाढी एकादशी निमित्त मराठी सिनेसृष्टीत विठूनामाचा गजर, पाहा कलाकारांचे स्पेशल photos कलाकारांसाठी त्यांचे चाहते कायम काहीतरी भन्नाट गोष्टी करत असतात. अगदी वेगवेगळ्या कलांपासून चाहते काही ना काही बनवून, प्रचंड मेहनत घेऊन कलाकारांना भेट करत असतात. कलाकार सुद्धा चाहत्यांच्या या कलेचं कौतुक करत असतात.

जाहिरात

असाच एक कलेचा नमुना नेहाच्या चाहतीने बनवल्याचं दिसून येत आहे. तिच्या या कलेचं खूप कौतुक होत आहे. नेहाच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा देत कमेंट केल्या आहेत. नेहा शितोळे सध्या कोणत्या नव्या प्रोजेक्ट मध्ये डिनर याबद्दल तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. नेहाने ‘सेक्रेड गेम्स’ नावाच्या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या वेबसिरिजला नुकतीच चार वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने नेहाने एक खास रीलसुद्धा शेअर केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात