मुंबई, 13 मार्च- बॉलिवूड गायिका नेहा कक्कर ( neha kakkar ) तिच्या स्टाईलिश अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. नुकतीच नेहा मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. नेहाने निळ्या रंगाची हूडी सोबत स्वेटशर्ट घातला होता. सोबतच तिनं लूज जीन्स देखील घातली होती. यावेळी ती नो मेकअप लुकमध्ये होती व तिनं चेष्मा देखील घातला होता. यावेळी तिचा वजन देखील वाढलेले दिसले. मग काय सोशल मीडियावर ट्रोलर्संनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. काहींनी तिला वाढलेल्या वजनावरून सुनावल तर काहींनी तिला वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला. तर काहींनी तिला प्रेग्नेंट आहेस का ? ( neha kakkar pregnant ) असं देखील विचारलं.
एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, किती जाड झाली आहेस.तर एकानं कमेंट करत म्हटलं आहे की, ही कोण आहे? तर काहींनी तिच्या उंचीवरून तिला ट्रोल केलं आहे. काहींनी जरी तिला ट्रोल केलं असलं तरी काही फॅन्स तिच्या सपोर्टमध्ये देखील उतरले आहेत. एकाने म्हटलं आहे की, कोणी किती का मोठा सेलिब्रिटी असला तरी त्याला बॉडी शेमिंगचा सामना हा करावा लागतो. तर एका चाहत्याने म्हटलं आहे की, नेहानं खरं तर या सगळ्या ट्रोलर्संवर लक्ष द्यायला नको..असं म्हणत तिच्या चाहत्यांनी तिला पाठींबा दिला आहे.
वाचा-'ढोलिडा' गाण्यावर लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींचा भन्नाट डान्स, Video Viral
अवॉर्ड सोहळ्यात झाली होती सहभागी
नेहा कक्करनं नुकतीच पती रोहनप्रीतसोबत मिर्ची अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाली होती. या सोहळ्यात तिचा परफॉर्मंस होता. दोघांनी स्टेजवर परफॉर्मंस देखील केला. नेहाने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
नेहा कक्करने ऑक्टोबर 2020 मध्ये रोहनप्रीसोबत लग्न केले. या दोघांच्या लग्नाच्या सर्व विधी दिल्लीतील गुरूद्वाऱ्यामध्ये पार पडल्या. दोघेही चंदीगडमध्ये पहिल्यांदा भेटले होते. या दोघांना नेहूप्रीत म्हणून देखील ओळखले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Neha kakkar