जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नेहाची कक्करची मिडनाईट डोसा पार्टी; खास व्यक्तीसोबत केली भटकंती

नेहाची कक्करची मिडनाईट डोसा पार्टी; खास व्यक्तीसोबत केली भटकंती

नेहाची कक्करची मिडनाईट डोसा पार्टी; खास व्यक्तीसोबत केली भटकंती

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या तिची मॅरीड लाइफ जोरदार एन्जॉय करताना दिसते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 डिसेंबर : अगदी महिनाभरापूर्वी  लग्नबंधनात अडकलेलं कपल नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग जोरदार चर्चेत आहे. नेहाचे लग्नपासून हनिमून पर्यंतचे फोटो सोशल मीडिया (social Media) ट्रेंडिंग होते. आता पुन्हा एकदा नेहाचा पती रोहनप्रीत बरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शनिवारी रात्री  नेहा कक्करला तिचा पती रोहनप्रीत सिंह बरोबर मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले. दोघंही कुठे निघाले विचारलं असता ‘ते डोसा खायला निघाले आहेत’ असं उत्तर नेहाने दिल. दरम्यान दोघंही एकमेकांबरोबर फारच आनंदी दिसत आहेत. नेहा आणि रोहनप्रीतला स्पॉट केलेल्या कॅमरामॅनने त्यांचा हा व्हिडिओ स्वतःच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटला शेअर केला असून त्यावर काही तासातच 55 हजारापेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.व्हिडिओमध्ये नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग कारमध्ये बसून असल्याचं दिसत आहे. सध्या नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

जाहिरात

नेहा कक्कर (Neha Kakkar) कायमच सोशल मीडियावर (Social Media) अ‍ॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर (Instagram) तिचे 5 कोटींच्या जवळपास फॉलोअर्स (Followers) आहेत. नेहा तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या सोशल मीडिया पेज वरून देताना दिसते. एक महिन्यापूर्वीच नेहा सिंगर रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) बरोबर लग्न बंधनात अडकली असून तिने तिच्या लग्नाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले होते. आता लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा रोहनप्रीतबरोबर मुंबईच्या रस्त्यावर भटकताना ती दिसली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात