मुंबई, 08 नोव्हेंबर: बॉलिवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत (Rohanpreet)चं नुकतंच धुमधडाक्यात लग्न झालं. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती नेहूप्रीतच्या हनीमूनची. नेहा आणि रोहनप्रीतच्या हनीमूनचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
एअरपोर्ट आणि हॉटेलरुममधला व्हिडीओ
नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने लग्नाच्या प्रत्येक समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. नेहा आणि रोहनप्रीत आता हनीमूनला गेले आहेत. त्यांच्या हनीमूनच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांनी वेगवेगळ्या काँमेंट्स केल्या आहेत. हे कपल दुबईला सध्या हनीमूनला गेलं आहे.
मुंबई विमानतळावर नेहाला विशेष ट्रिटमेंट मिळाली. विमानतळावरील कॉफी शॉपमध्ये ‘स्टे सेफ नेहा’ असं लिहलेला कप तिला मिळाला. कॉफी शॉपमधील कर्मचाऱ्यांनी दिलेलं प्रेम पाहून नेहा भलतीच खूश झाली.
मिसेस सिंह
लग्नानंतर नेहा कक्कर नाव बदलणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. त्याचं उत्तर आता मिळालं आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर नेहा कक्कर आणि मिसेस सिंह असा बदल तिने आपल्या नावामध्ये केलेला आहे. 24 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये नेहाचं लग्न पार पडलं. त्यानंतर 26 ऑक्टोबरला तिचं रिसेप्शनही झालं. लग्नाच्या आधी नेहा कक्करचं नाव वेगवेगळ्या गायकांशी जोडलं होतं. पण नेहाने स्वत: सोशल मीडियावर तिच्या आणि रोहनप्रीत सिंहच्या लग्नाची माहिती दिली आणि वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. कोरोना काळातही नेहाचं लग्न अतिशय दणक्यात पार पडलं.