मुंबई, 26 जुलै : टीव्हीवर गेल्या काही काळात रिअॅलिटी शोजची लोकप्रियता वाढली आहे. साहजिकच त्यांचं प्रमाणही वाढलं आहे. गाण्यापासून नृत्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे रिअॅलिटी शोज विविध चॅनेल्सवरून प्रसारित होतात. सुपर डान्सर हा रिअलिटटी शो खूपच लोकप्रिय आहे. त्याचा तिसरा सीझन सध्या सुरू आहे; मात्र हा शो एका कारणामुळे अडचणीत आला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) सोनी पिक्चर्स नेटवर्कला नोटीस बजावली आहे. त्यामागचं कारण काय, याबाबत जाणून घेऊ या. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने सोनी पिक्चर्स नेटवर्कचे तक्रार निवारण अधिकारी शाइस्ता नक्वी यांना एक पत्र लिहिलं आहे. ‘सुपर डान्सर’च्या तिसऱ्या चॅप्टरमधला एक एपिसोड काढून टाकावा, असं त्यांनी त्यात म्हटलं आहे. जजेसनी त्या एपिसोडमध्ये एका छोट्या स्पर्धकाला कथितरीत्या त्याच्या आई-वडिलांच्या लैंगिक संबंधांबद्दल प्रश्न विचारण्यात आल्याचं त्या पत्रात म्हटलं असून, त्या कारणामुळे तो एपिसोड काढून टाकण्यास सांगण्यात आलं आहे. हेही वाचा - कल्की कोचलिनला ‘या’ कारणामुळे समजलं जायचं ड्रग पेडलर; केली होती घाणेरडी मागणी ‘सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून प्रसारित झालेल्या सुपर डान्सर चॅप्टर थ्रीच्या एका एपिसोडमधला व्हिडिओ आयोगाला ट्विटरवर सापडला आहे. त्यात जजेस एका अल्पवयीन मुलाला त्याच्या आई-वडिलांशी संबंधित अश्लील प्रश्न विचारताना दिसत आहेत. हे प्रश्न अल्पवयीन मुलांना विचारण्याजोगे नव्हते. त्यांच्यासाठी ते अनुचित होते. त्यामुळे हा एपिसोड काढून टाकावा. तसंच, अशा प्रकारचे अनुचित प्रश्न अल्पवयीन स्पर्धक कलाकारांना का विचारण्यात आले, याचं स्पष्टीकरणही द्यावं. या संदर्भात कोणती कार्यवाही करण्यात आली, याचा अहवाल सात दिवसांच्या आत आयोगाकडे पाठवावा.
NCPCR has written to Sony Pictures Networks over a video on social media showing a clip from an episode of the children's dance show Super Dancer -Chapter 3 which aired on Sony Entertainment Television where judges were allegedly seen asking a minor "vulgar & sexually explicit"… pic.twitter.com/0w6KwEF6Ye
— ANI (@ANI) July 25, 2023
तसंच, यापुढे अशा प्रकारचा अनुचित कंटेंट आपल्या चॅनेलवरून प्रसारित होणार नाही, याची काळजी घ्यावी,’ असं ‘एनसीपीसीआर’चे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी नक्वी यांना पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे. सुपर डान्सर 3मधली त्या लहान मुलाचा व्हिडीओ
Super Dancer 3: शो में बच्चे से मम्मी-पापा को लेकर बात की, जो वीडियो अब वायरल रहा है जिसे लेकर NCPCR ने सोनी टीवी को भेजा नोटिस।#sonytv #NCPCR #Superdancer #entertainment pic.twitter.com/3x9v9KVm5f
— Journalist- Priyanka Dagar - "InkMaven ScoopBelle" (@priyankadagar03) July 26, 2023
या संदर्भात आयोगाने ‘बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005’च्या कलम 13 (1) (J) चा आधार घेतला. या एपिसोडमुळे ज्युव्हेनाइल जस्टिस अॅक्ट 2015 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 यांचं उल्लंघन झालं आहे. तसंच, करमणूक उद्योगात अल्पवयीन आणि किशोरवयीन मुलांच्या सहभागासंदर्भात आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचंही उल्लंघन झालं आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी नोटीस आयोगाने बजावली आहे.