मुंबई, 14 मे- पीएसआय असलेली अभिनेत्री पल्लवी (actress pallavi jadhav ) जाधव लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच तिचा मेंदी आणि हळदीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. सोशल मीडियावर याचे काही व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल झाले आहेत. पल्लवीनं तिच्या इन्स्टाला तिच्या हळदीचे व मेंदीच काही फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. ती खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पल्लवी ही मुळची औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होते. त्यादिशेने तिचे प्रयत्न देखील सुरू होते.
आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवीनं कॉलेजचे शिक्षण आणि त्यानंतर एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. .कमवा आणि शिका या योजनेतून 2015 साली 80 टक्के गुण मिळवून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील यश मिळवलं. पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करत आहे.
पल्लवीनं जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला आहे. लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या “हैद्राबाद कस्टडी” या चित्रपटात नायिका बनून पल्लवी प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळं अधिकारी होण्यासोबतचं तिचं अभिनेत्री होण्याचं देखील स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.