मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सई ते अंकुश मराठीसह 'या' हिंदी कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची NCPची मागणी, काय आहे प्रकरण?

सई ते अंकुश मराठीसह 'या' हिंदी कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची NCPची मागणी, काय आहे प्रकरण?

actor

actor

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. यात अनेक आघाडीचे हिंदी आणि मराठी कलाकारांची नावं आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जानेवारी : ऑनलाईन माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. अशातच एक पर्याय प्रामुख्यानं सर्वांसमोर येत आहे तो म्हणजे ऑनलाइन रमी. ऑनलाईन रमी खेळा आणि पैसे कमवा ही जाहीर सर्रासपणे प्रत्येकाच्या फोनवर येत असते. यात अनेक प्रसिद्ध कलाकार अगदी हिंदी सिनेसृष्टीपासून ते मराठी सिनेसृष्टीतील कलाकार या खेळाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. मात्र ऑनलाईन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या जाहिरांतीतील मराठी आणि हिंदी कलाकारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. यात अनेक आघाडीचे हिंदी आणि मराठी कलाकारांची नावं आहेत. मटानं याबाबत वृत्त दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. काही कलाकार हे सामाजाचं स्वास्थ बिघडवणाऱ्या दारू, गुटखा अशा जाहिराती नाकारत आहेत त्यांचं आम्ही कौतुक करतो. पण फक्त पैसे कमावण्याच्या उद्दीष्टानं समाजस्वास्थ बिघडवत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शिक्षा करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Tejaswini Pandit : संजय जाधवबरोबरच्या नात्याबद्दल तेजस्विनीचं पहिल्यांदा भाष्य; म्हणाली तो माझा...

महाराष्ट्रात जुगार, मटका किंवा पत्ते खेळण्यास सत्त मनाई आहे. असं करताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याती तरतूद करण्यात आली आहे. पण वाढत्या टेक्नलॉजिच्या काळात आता रमी म्हणजेच पत्त्यांचा हा खेळ ऑनलाईन माध्यमातून खेळला जाऊ लागला आहे. अनेक कलाकार याची जाहिरात करून लोकांना रमी खेळण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीकडून ऑनलाईन रमी खेळण्यासाठी जाहीरात करणाऱ्या मराठी आणि हिंदी कलाकारांची यादी काढली आहे. ज्यात अभिनेत्री सई ताम्हणकर,  श्रृती मराठे, अंकुश चौधरी, अमेय वाघ, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, उमेश कामत, गौरी नलावडे आणि अमृता खानविलकर या मराठी कलाकारांनी नावं आहेत.

त्याचप्रमाणे हिंदी सिनेसृष्टीतील ऋतिक रोशन, अन्नू कपूर, कुमार सानू, आलोक नाथ, अनुप सोनी, मनोज वाजपेयी, अली असगर, शिशिर शर्मा, रजा मुराद या कलाकारांचा या यादीत समावेश आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news