मुंबई,10 मे- मनोरंजनसृष्टीशी निगडित कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये आपलं मजबूत स्थान निर्माण केलं आहे. नवाजुद्दीनने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत अफाट लोकप्रियता मिळवली आहे. एखादया हिरोसाठी आखून ठेवलेली उंच, देखणं, पिळदार शरीरयष्टी असं व्यक्तिमत्व नसूनदेखील केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीनने स्वतःला सिद्ध केलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांना आपल्या कारकिर्दीत इंडस्ट्रीतील तिन्ही खानसोबत काम करण्याची संधी मिळालीय. नुकतंच एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकी ने आमिर,शाहरुख आणि सलमान या तिघांसोबत आपलं नातं कसं आहे. आणि ते तिघे आपल्याला कशी वागणूक देतात याबाबत खुलासा केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने सलमान खानसोबत ‘किक’ (2014) आणि ‘बजरंगी भाईजान’ (2015) मध्ये अप्रतिम काम केलं आहे. नवाजुद्दीनने आमिर खानसोबत 2012 मध्ये आलेल्या ‘तलाश’ चित्रपटात काम केलं आहे. आणि त्याच्या प्रोडक्शन अंतर्गत बनलेल्या ‘पीपली लाइव्ह’ (2010) मध्येसुद्धा काम केलं आहे. तसेच करिअरच्य सुरुवातीला त्याने 1999 मध्ये आमिर खानच्या ‘सरफरोश’मध्येही अतिशय छोटीशी भूमिका साकारली होती. तसेच नवाजुद्दीनने 2017 मध्ये आलेल्या ‘रईस’ चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केलं आहे. अशाप्रकारे नवाजुद्दीनने तिन्ही खानसोबत मिळून हिट सिनेमे दिले आहेत. (हे वाचा:‘ 14 व्या वर्षीच घरातील कामवालीशी संबंध’, पत्नीच्या ‘त्या’ पुस्तकाने हादरलेले ओम पुरी, दुसऱ्यांदा झालेला घटस्फोट ) नुकतंच बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत नावाजने सांगितलं की , ’ सलमान असो, शाहरुख असो किंवा आमिर, त्यांच्यासोबत काम करणं हा खूप रंजक अनुभव आहे.जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे आशय-आधारित चित्रपट असतो तेव्हा तेव्हा ते मला फोन करतात. कारण ते मला आणि माझ्याला कामाला चांगलंच ओळखतात. ते तिघेही मला वैयक्तिकरित्या ओळखतात आणि म्हणूनच माझे त्यांच्याशी घट्ट नातं आहे. इतके मोठे सुपरस्टार माझ्यासोबत इतक्या नम्रपणे वागतात-बोलतात अर्थातच ते मला जवळचा समजतात’. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. नवाज गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आलियाने त्याची आई आणि त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली प्रतिमा खराब केली जात असल्याचं म्हटलं आहे. नवाजुद्दीन हा असा अभिनेता आहे. जो आपल्या खाजगी आयुष्याबाबत क्वचितच व्यक्त होतो. तो आपलं खाजगी आयुष्य नेहमी मीडियापासून दूर ठेवतो. नवाज सध्या आपल्या आगामी ‘हड्डी’ या सिनेमामुळेसुद्धा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने ट्रान्स जेंडरची भूमिका साकारली आहे.